पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या अपघातावरून पार्थ पवारांचे ट्विट

वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी

0

पिंपरी : फुगेवाडी येथे अपघातात सहा वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी लक्ष वेधले आहे. गेल्या ९ महिन्यांमध्ये विविध अपघातांमध्ये तब्बल २१० नागरिकांचा बळी गेला आहे. सुमारे ३०० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पार्थ पवार यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने वाढते आपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यक आहे. याकडे पार्थ पवार यांनी लक्ष वेधले आहे.

फुगेवाडी येथे झालेल्या अपघातात ६ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर पिंपरी-चिंचवड पोलीस आणि महापालिका प्रशासनाने ‘‘अपघातांना जबाबदार कोण यापेक्षा ते रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक विकासकामे अर्धवट असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने सुनियोजित पिंपरी-चिंचवड शहराचा कारभार बिघडून सुरू केलेली कामे अपूर्ण राहिली आहेत, अशी टीका करीत ‘‘हिच का स्मार्ट सिटी’’ असा सवालही युवा नेते पार्थ पवार यांनी उपस्थित केला आहे.

फुगेवाडीत ६ वर्षांच्या चिमुरडीचा अपघातात बळी गेलाय. पिंपरी चिंचवडमध्ये मागील ९ महिन्यात अपघातांमध्ये २१० जणांचे बळी गेले आहेत. तर ३०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाल्याची नोंद असून, अपघातांना जबाबदार कोण यापेक्षा ते रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात @PCcityPolice @pcmcindiagovin

— Parth Pawar (@parthajitpawar) October 30, 2021

स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक विकासकामे अर्धवट असल्याने नागरिकांना याच्या परिणामांना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सुनियोजित पिंपरी चिंचवड शहराचा कारभार बिघडवून सुरू केलेली कामे अपूर्ण राहिली आहेत. #pcmc #हीच_का_स्मार्ट_सिटी pic.twitter.com/mzS7SLXno3

— Parth Pawar (@parthajitpawar) October 30, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.