पैशासाठी भंगार व्यवसायिकाचे अपहरण; आरोपींना अटक

0

पिंपरी : अपहरण करून भंगार व्यवसायिकाला जबर मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक केले आहे. म्हाळुंगे येथील परिसरातून 28 वर्षीय भंगार व्यवसायिकाचं 4 जणांनी अपहरण केलं. पैशांची मागणी करत मोटारीतून डोंगराळ परिसरातून फिरवलं. पैसे दे, अन्यथा तुझी बोटं कापू, तुला जीवे मारू अशा धमक्या देत बेदम मारहाण करण्यात आली. या आरोपींना पिंपरीच्या (गुन्हे शाखा) युनिट तीनने अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, आरोपींनी म्हाळुंगे येथील वासुली फाटा येथून 28 वर्षीय भंगार व्यवसायिकाचे अपहरण केले होते. अगोदर आरोपींनी भंगार व्यवसायिकाला आम्हाला भंगार विकायचे आहे, ते काही अंतरावर असून तुम्ही सोबत या सांगितले. तो विश्वास ठेवून आरोपींसोबत गेला, मात्र, त्याला मोटारीत बसल्यानंतर तुझी बोटं कापू, तुला जीवे मारू अशा धमक्या देऊन बेदम मारहाण करत पैशांची मागणी केली गेली.

काही तास व्यवसायिकाला मोटारीतून डोंगराळ परिसरात फिरवलं. त्याच्या बँक खात्यातून, गुगल पेद्वारे 1.5 लाख रुपये काढून घेतले आणि त्याला ठराविक मध्येच सोडून दिलं. जखमी अवस्थेत व्यवसायिक म्हाळुंगे पोलिसांत फिर्याद दिली. दरम्यान, आरोपी हे आंबेठाण गावातून जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. या माहितीनुसार गावात वाहतूक कोंडी करून सापळा रचत आरोपीच्या मुसक्या  आवळल्या.

दरम्यान, याप्रकरणी सरदार अकबर सय्यद, शरद ज्ञानेश्वर मोरे, रामदास मारुती साळुंखे, प्रभू शिवलिंग कोळी या आरोपींना अटक करण्यात आलं आहे. दरम्यान, आरोपी शरद ज्ञानेश्वर मोरे आणि रामदास मारुती साळुंखे हे दोघे जण काही महिन्यांपूर्वी खुनाच्या प्रकरणातून जेलमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली होती. यामुळे ते भंगारच्या उद्देशाने अपहरण करत पैसे लुटत आहेत .

ही कारवाई पोलीस निरीक्षक बाबर, उपनिरीक्षक गिरीष चामले आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.