पुणे : कोरोना, लॉकडाऊन या नंतर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. असे असताना यातील अपुऱ्या ज्ञानामुळे अनेकांना ‘लॉस’ सहन करावा लागतो आहे. याच साठी 1 नोव्हेंबर पासून आयएसओ नामांकित असणाऱ्या ‘रुची इन्स्टिट्यूट’ची शाखा कोथरूडमध्ये सुरु होत आहे.
रुची शेअर मार्केट इन्स्टिट्यूटचे ‘चॅनेल पाटर्नर’ गणेश दिघे आणि अविनाश पठारे हे सिताचंद्र, ऑफिस नंबर 3, इंदिरा शंकर नगरी, पौड रोड, कोथरूड येथे शाखा सुरु करत आहेत.
सोमवारी 1 नोव्हेंबर रोजी सुरु होणाऱ्या या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यास रुची शेअर मार्केटचे डायरेक्टर दत्तात्रय विभूते उपस्थित राहणार आहेत.
पुणे तसेच कोथरूड मधील नागरिकांसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे . शेयर मार्केट मध्ये ज्ञान घेऊन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी बेसिक ते अडव्हान्स कोर्स या ठिकाणी शिकवले जाणार आहेत. या क्षेत्रातील 16 वर्षे अनुभव असणारे प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.