आता फडणवीसांचा बॉम्ब : मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध ; पुरावे देणार

0

मुंबई : मुंबई क्रूझ प्रकरण चांगलेच गाजत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे रोज नवीन माहिती समोर आणत आहेत. आज तर त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने ड्रग्जचा खेळ सुरु असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला. यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली तर देवेंद्र फडणवीसांनी मलिकांच्या आरोपांचे खंडन केलं.  मालिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे सांगत याचे पुरावे मी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मलिक यांनी आज टि्वट केलेला फोटो चार वर्षापूर्वीचा आहे. त्याचे माझ्यासोबतही फोटो आहेत, पण त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो टि्वट केला आहे. मलिक यांच्या जावायाकडे ड्रग्ज सापडले, तर सर्वच राष्ट्रवादी ड्रग्ज माफीया आहे का?

फडणवीस यांच्याकडून ड्रग्ज रॅकेटला संरक्षण मिळत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला असून याची सीबीआय किंवा न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मलिक यांनी सोमवारी सकाळी अमृता फडणवीस यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये असलेली व्यक्ती ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. जयदीप राणा असं या व्यक्तीचे नाव आहे. निशांत वर्मा या राजकीय विश्लेषकांनीही हा फोटो ट्विट केला आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच अटक कऱण्यात आली आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.