शिवसेनेचा महाराष्ट्रा बाहेर पहिला खासदार

ॲड. डॉ. अतिश लांडगे यांचा मोलाचा वाटा

0

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दादरा नगर हवेली मध्ये खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते.  दादरा नगर हवेली लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर सेनेचा खासदार कलाबेन देलकर झाल्या आहेत.

दिवंगत खासदार स्वर्गीय मोहनभाई डेलकर हे आजपर्यंत 7 वेळा वेगवेगळ्या पक्षातून तर कधी स्वतःचा पक्ष काढून व कधी अपक्ष संसदेत निवडून गेले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मुंबई येथे आत्महत्या केली. मोहनभाई डेलकर यांचे बी ए.चे शिक्षण डॉ.डी.वाय पाटील पिंपरी येथे झाले असल्यामुळे ॲड. अतिश लांडगे यांची त्यांची घनिष्ट मैत्री होती. तसेच महाराष्ट्र बाहेर पुणे विद्यपीठाचे पहिले कॉलेज हे दादरा नगर हवेली येथे सुरू आहे. त्याच्या निमित्ताने ही मोहनभाई हे पुण्याला अतिश लांडगे यांच्याकडे येत असतं.

दोन वर्षापूर्वी पिंपरी च्या 50 वकिलांची सहल ही दादरा नगर हवेली तसेच दमण फिरण्यासाठी गेली होते. त्या वेळेस सर्व वकिलांची व्यवस्था मोहनभाई यांनी केली होती. आत्महत्या नंतर 8 महिन्यांनी दादरा नगर हवेली मध्ये खासदारकी ची पोट निवडणुक लागलेली होती. उमेदवारी फॉर्म भरायला शेवटचे 2 दिवस बाकी होते. सर्वच पक्ष मोहन डेलकर यांच्या परिवाराला आमच्या पक्षातून निवडणूक लढविण्यासाठी दबाव टाकत होते.

डेलकर परिवाराचे राष्ट्रवादी किंवा शिवसेनेतून निवडणूक लढविण्याचे ठरले. मात्र पक्ष प्रमुखांशी महाराष्ट्र मध्ये संपर्क कसा साधायचा आणि कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची या संदर्भात मोहनभाई डेलकर यांनी जवळचे मित्र ॲड. अतिश लांडगे यांच्याशी संपर्क साधला आणि शिवसेनेतून लढण्याचे नक्की झाले. ॲड. अतीश लांडगे यांनी क्षणाचाही विलंब न करता मावळ चे खासदार शश्रीरंग आप्पा बारणे यांच्याशी संपर्क साधून सर्व हकीकत व परिस्थिती सांगितली.

श्रीरंग बारणे यांनी खासदार संजय राऊत व शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांना संपर्क साधून सर्व घटनेची माहिती दिली. शेवटचे 2 दिवस असताना सकाळी 11 वाजता खासदार श्रीरंग बारणे यांचा अतिश लांडगे यांना फोन आला. अद्याप मातोश्री वरून  कोणताच आदेश आला नसल्याचे सांगितले. दरम्यान दुपारी साडे बाराच्या सुमारास खासदार बारणे यांचा फोन आला.

संध्यकाळी मीटिंग झाल्यावर खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पूर्ण पणे डेलकर परिवाराच्या पाठीमागे उभी राहील असा शब्द दिला.  शिवसेना मध्ये दुसऱ्याच दिवशी वर्षा बंगल्यावर प्रवेश करायचे निश्चित झाले. त्यानुसार डेलकर परिवाराचा शिवसेनेत प्रवेश झाला. मोहनभाई डेलकर यांच्या पत्नी श्रीमती कलाबेन डेलकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे निश्चित झाले. याची जबाबदारी खासदार श्रीरंग बारणे व अतिश लांडगे यांच्यावर दिली. तसेच महाराष्ट्र चे 10 खासदार व स्वतः युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई यावर लक्ष ठेवून होते.

खासदार श्रीरंग बारणे यांनी तेथे जाऊन सभा घेतल्या. आज मतमोजणी झाली आणि यामध्ये शिवसेनेच्या उमेदवार श्रीमती कलाबेन देलकर मोठ्या फरकाने विजयी झाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.