‘त्या’ही मुलांच्या चेहऱ्यावर फुलला दिवाळीचा आनंद

सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे युवा मंचचा स्तुत्य उपक्रम

0

पिंपरी : दिवाळी सणानिमित्त शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रम सुरु आहे. अनेकजण आपल्या जवळच्या व्यक्तींना गिफ्ट, मिठाई देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होत आहेत. मात्र वाकड, कस्पटे वस्ती परिसरातील तरुणांनी अनाथ आश्रमात जाऊन तेथील मुलांसोबत दिवाळी साजरी केली.

दिवाळी सण सर्वत्र धुमधडाक्यात साजरा होत असताना पालकांच्या प्रेमाला पोरके झालेल्या अनाथांना आपुलकीचा हात द्यावा, या उद्देशाने गणेश कस्पटे युवा मंचच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम करण्यात आला. चिंचवड येथील गुरुकुल अनाथ आश्रमात मुलांसोबत दिवाळी साजरी केली. मुलांना मिठाई देऊन त्यांचे तोंड गोड केले. मुलांना फटाके देऊन त्यांच्या आनंदात सहभागी झाले. यामुळे या सर्व मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले  होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोहन कस्पटे, विशाल मानकर , सचिन कस्पटे, अनिल कस्पटे, सुधिर कस्पटे , सौरभ कस्पटे , योगेश कस्पटे , सोमनाथ कस्पटे , शुभम कस्पटे, गणेश कस्पटे युवा मंच आणि कस्पटे वस्ती फटाका असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Leave A Reply

Your email address will not be published.