दिवाळीत वाहनचालकांना थोडासा दिलासा

डिझेल १० रुपयांनी तर पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

0

नवी दिल्ली : ऐन दिवाळीत, लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्येला आज पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. यामुळे वाहन चालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

पुणे शहरात पेट्रोल आता ११५.५२ रुपयांवरून ११० रुपये प्रति लिटरने मिळेल. डिझेल हे १०४.६७ पैशांवरून पुन्हा शंभर रुपयांच्या आत म्हणजे ९४ रुपये प्रति लिटरने मिळेल. हे दर तीन नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

देशभरातील झालेल्या विविध राज्यांतील पोटनिवडणुकांच्या कालच्या निकालात भाजपला चांगलाच दणका बसल्याने हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या पराभवाचे खापर महागाईवर फोडले. त्यातही विशेषतः पेट्रोल आणि डिझेलच्या वाढते दर आणि महागाईमुळे निवडणुकीत पराभव झाल्याचे म्हटले आहे.

या समोर उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा फटका बसण्याचा धोका लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात पेट्रोल-डिझेलवरील दर कमी झाल्याने थोड्या प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

देशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे निवडणुकीत यश प्राप्त करता आले नसून चांगलीच चपराक बसल्याने धास्ती घेत चक्क पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याने जाग आल्याचे चित्र निवडणुकीच्या निकालावरून दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.

The reduction in excise duty on diesel will be double that of petrol and will come as a boost to the farmers during the upcoming Rabi season. States urged to reduce VAT on petrol & diesel to give relief to consumers: Govt Sources

— ANI (@ANI) November 3, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.