08 पिस्टल, 01 रिव्हॉलर आणि 11 जीवंत काडतुस जप्त

पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाची कारवाई

0

पिंपरी :  पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे.  आगामी निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर 05 सराईत गुन्हेगारांना अटक केले आहे. अटक केलेल्या आरोपींकडुन 08 पिस्टल, 01 रिव्हॉलर आणि 11 जीवंत काडतुस असा एकुण 03 लाख 52 हजार 200 रुपये किमतीचे शस्त्रे व काडतुस हस्तगत करण्यात आले आहेत. खंडणी विरोधी पथकाच्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कौतुक करुन पथकाला 30 हजाराचे बक्षिस आणि प्रमाणपत्र जाहिर केले आहे.

प्रताप उर्फ बाळ्या हनुमंत पवार (29 वर्ष, रा. गोळे यांची बिल्डींग फ्लॅट नं. 9, पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे), पंकज उर्फ बंडा शामसुंदर पारीख (25 वर्ष, रा. भोकरंबा, ता. रेणापूर, जि. लातुर), गौरव मच्छिंद्र डोंगरे (23 वर्ष, रा. बलुत आळी, चाकण, ता. खेड, जि. पुणे), शंकर शिवाजी वाडेकर (30 वर्ष, रा. भांबोली, बालाजी हॉस्पिटल समोर, ता. खेड, जि. पुणे), अजय बिंदुमाधव सातपुते (25 वर्ष, रा. विठ्ठल रखमाई मंदिराजवळ, हिंजवडी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. 

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परीषदेत दिलेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या विरोधात विशेष मोहिम सुरु केली आहे. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची झाडाझडती घेत असताना पोलीस अंमलदार निशांत काळे, गिरीगोसावी, आशिष बोटके आणि सुधीर डोळस यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार पिस्टल घेवुन येणार आहेत. त्यांच्याकडे जीवंत काडतुस देखील आहेत.

मिळालेल्या माहितीवरुन सराईत गुन्हेगार प्रताप पवार याला ताब्यात घेवुन त्याच्याकडुन 02 पिस्टल व 03 जीवंत काडतुस हस्तगत केले. चौकशी दरम्यान त्याने हे पिस्टल त्याचा साथीदार पंकज पारीख याच्याकडुन घेतले असल्याचे सांगितले. पथकाने त्याला लातुर येथुन ताब्यात घेवुन त्याच्या कडुन 02 पिस्टल 02 जीवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार गौरव डोंगरे याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडुन 02 पिस्टल, 01 रिव्हॉलर आणि 03 जीवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. त्याचा साथीदार शंकर वाडेकर याला खेड मधील बालाजी हॉस्पिटल समोरुन ताब्यात घेतले. त्याच्याकडुन 01 पिस्टल व 01 जीवंत काडतुस जप्त करण्यात आले. रेकॉर्ड वरील गुन्हेगार अजय सातपुते याला ताब्यात घेवुन त्याच्याकडील 01 पिस्टल आणि 02 जीवंत काडतुस जप्त करण्यात आली. त्याच्या विरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडणी विरोधी पथकाने पोलीस रेकॉर्ड वरील 05 गुन्हेगारांना अटक करुन पोलीस कोठडीत रिमांड घेवुन चौकशी केली असता त्यांच्याकडुन 08 पिस्टल, 01 रिव्हॉलर व 11 जीवंत काडतुस असा एकुण 03 लाख 52 हजार 200 रुपये किमतीचे पिस्टल आणि काडतुस हस्तगत करण्यात आले आहे. या पाच सराईत गुन्हेगारां पैकी काही आरोपींवर लातुर, वाकड, चाकण, देहुरोड, हिंजवडी अशा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.   

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, पोलीस उप-निरीक्षक महेंद्र पाटील, शाकिर जिनेडी, सहायक पोलीस उप-निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार निशांत काळे, गणेश गिरीगोसावी, आशिष बोटके, प्रदिप गोडांबे, सुधीर डोळस, किरण काटकर, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, अमर राऊत, सुनिल कानगुडे, शैलेश मगर, संदिप पाटील, अशोक गारगोटे, शकुर तांबोळी, प्रदिप गुट्टे, रमेश मावसकर, प्रदिप गायकवाड यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.