15 हजार दिव्यांनी लकलकले भक्ती-शक्ती शिल्प

0

पिंपरी : कै. मधुकर पवळे प्रतिष्ठाणच्या वतीने दिवाळी पाडवा 15 हजार दिवे लावून ‘दिपोत्सव’ साजरा करण्यात आला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी याचे उदघाटन करण्यात आले.

निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात आज सकाळी लख्ख लख्ख तेजोमय प्रकाश पडला. निगडी परिसरातील कै. मधुकर पवळे प्रतिष्ठाण आणि महिलांनी सुमारे 15 हजार हुन अधिक दिवे लावून दिवाळी पाडवा साजरा केला.

नगरसेविका सुमन पवळे, दत्तात्रय पवळे यांच्यासह इतर नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी दिव्यामध्ये बनवलेले शंकर महादेवाची पिंड, त्रिशूल आणि ओम आकर्षण होते.

Leave A Reply

Your email address will not be published.