पिंपरी चौकातील सोसायटीत घुसून राडा; पोलिसांनी केली आरोपींना अटक

0

पिंपरी : वर्दळीच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे आत्मानगर सोसायटी, पिंपरी येथे घुसून टोळक्याने राडा घातला. भाच्याने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून मामावर खुनी हल्ला केला. यामध्ये मामा गंभीर जखमी झाला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

संतोष भास्कर नागोजे, त्याचे मित्र गोपाल, सोन्या, मिठ्या चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी देवेंद्र लक्ष्मण कांबळे (वय 42, रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवेंद्र कांबळे हे आरोपी संतोष नागोजे याचे मामा आहेत. कांबळे आणि त्यांचा मित्र राजेश अशोक गंजे (रा. गांधीनगर, पिंपरी) रविवारी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील बाजूला असलेल्या मैदानात रिक्षामध्ये बसले होते. त्यावेळी आरोपी भाचा संतोष आणि त्याचा मित्र गोपाल तिथे आले. आरोपींनी रिक्षात डोकावून पाहून आत्मानगर सोसायटीच्या गेटच्या समोर जाऊन थांबले.

फिर्यादी कांबळे त्या दोघांना पाहण्यासाठी गेले असता भाचा संतोष याने हात करून त्याच्या साथीदारांना बोलावून घेतले. संतोषचा संशय आल्याने फिर्यादी कांबळे आत्मानगर सोसायटीच्या आतमध्ये गेले. आरोपींनी सोसायटीमध्ये जाऊन फिर्यादी कांबळे यांना सिमेंटचा गट्टू आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

काही वेळाने सोन्या आणि मिठ्या हे दोघेजण तिथे आले. सोन्या याने त्याच्या हातातील कोयता फिर्यादी कांबळे यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. त्यात कांबळे यांच्या पायाला जखम झाली. आरोपी गोपाल याने पिस्तूल काढले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.