मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोकरे या दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे.
श्यामसुंदर अग्रवाल यांनी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलिस निरीक्षक आशा कोकरे, पोलिस निरक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर श्यामसुंदर अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ठाण्याच्या कोपरी पोलिस ठाण्यात वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.