पुणे : भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय करत असातना आर्थिक कारणांवरुन झालेल्या वादातून भागिदारावर खोटे गुन्हे दाखल केले. तसेच भागिदाराच्या पत्नीला कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी दाबाव टाकला. महिलेच्या भागिदार पतीला जिवे ठार मारण्याची धमकीदेऊन 14 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकामहिलेसह तीन बांधकाम व्यवसायिकांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलिंद भागवत पोखरकर, मनोदिप चव्हाण आणि एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एकामहिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.8) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 7 जून 2019 ते 2 ऑक्टोबर 2021 याकालावधीत तळेगाव दाभाडे येथील कडोलकर कॉलनीत घडला आहे. पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपींवर भादवि कलम387, 385,211,504,506,34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे भागिदारीमध्ये बांधकाम व्यवसाय करत होते.
तक्रारदार महिला यांचे पती आणि आरोपींनी व्यवसायासाठी जी एस महानगर बँक तळेगाव दाभाडे शाखेतून अडीच कोटी रुपयांचे कर्जघेतले होते.
हे कर्ज सर्व भागिदारांनी फेडायचे होते. परंतु आरोपींनी कर्ज फेडण्यास टाळाटाळ केली. आरोपी मिलिंद पोखरकर याने केर्जफेडण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी घरी बोलावून घेतले.
मिलिंद पोखरकर याच्याकडे कपिला इंटरप्रयजेस फर्मचे 30 लाख 37 हजार 500 रुपये होते. मात्र, त्यांच्या खात्यावर पैसे नसल्यानेत्यांनी दिलेले दोन्ही चेक बाऊन्स झाल्याने फर्यादी यांनी मिलिंद पोखरकर यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. फिर्यादीयांनी दाखल केलेली याचिका मागे घेतली नाही.
याचा राग मनात धरून मिलिंद पोखरकर याने फिर्यादी यांच्या पतीवर खोटे गुन्हे दाखल केले.
आरोपी मिलिंद पोखरकर यांनी काही कागदपत्र तयार करुन त्यावर फिर्यादी यांना सह्या करण्यास सांगितले.
मात्र, त्यांनी कागदपत्रांवर सह्या करण्यास नकार दिला.
त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेला तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी देऊन पतीवर दाखल असलेले गुन्हे मागे घेणार नसल्याचेसांगितले. तसेच आणखी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन महिलेकडे वारंवार 14 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली, असेफिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.