समीर वानखेडेंच्या लग्नपत्रिकेत वडिलांचे नाव दाऊद

0

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत त्यातच आता या वादात मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनी उडी घेतली आहे. त्यांनी ट्विटरवर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाची पत्रिका शेअर करत समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असे लिहिलेले आहे.

अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे ७ डिसेंबर २००६ मध्ये समीर वानखेडे यांचा शबाना कुरेशी यांच्याशी निकाह झाला आहे. या निकाहनाम्याच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये समीर हे दाऊद आणि जहिदा वानखेडे यांचे सुपुत्र असल्याचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर मलिक यांची दुसरी मुलगी सना मलिक शेख यांनीही विवाह दाखला शेअर केला असून ज्यामध्ये यास्मीन अझीज खान, निखिल छेडा आणि ग्लेन पटेल हे साक्षीदार असल्याचे दिसत आहे.

पत्रिकेसंदर्भात समीर वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता ती जी निमंत्रण पत्रिका शेअर करण्यात आली आहे ती आपली नसून पहिल्या पत्नीच्या कुटुंबीयांची आहे. त्यामुळे त्यांनी काय छापले, काय नाही हे आपल्याला माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.