मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्वच शाळा, काॅलेज बंद होत्या. मागील दोन महिन्यापांसून कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यास ठाकरे सरकारने परवानगी दिली. मात्र पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी नव्हती. आता पहिलीपासून शाळा सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. 1 डिसेंबरपासून राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग सुरू होणार आहेत.
पहिलीपासून सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन संसर्गित होणार नाहीत या पार्श्वभूमीवर त्यांना आपण शाळेमध्ये येऊन दिलं पाहिजे. 1 ली ते 4 थीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन सुरु करण्यास परवानगी द्यावी यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्सनं परवानगी द्यावी असं मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडलं होतं. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेटच्या बैठकीत शाळा सुरूबाबत अंतिम निर्णय होईल. असंही टोपे म्हणाले होते. या पार्श्वभुमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 1 डिसेंबर पासून पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मा.मुख्यमंत्री,मंत्रिमंडळ व पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने १ डिसेंबरपासून ग्रामीण भागात इ.१ली ते ४थी व शहरी भागात इ.१ली ते ७ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) November 25, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळ, पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.