पुणे : संयुक्त राष्ट्र संघाच्या उद्धिष्ट क्रमांक ४ मध्ये मानवी विकासासाठी शिक्षणाचे महत्व नमूद केले आहे. सर्वसमावेशक आणिन्यायबुद्धी ला अनुसरून दर्जेदार शिक्षण जे आयुष्यभर शिक्षणाच्या संधी सर्वांसाठी उपलब्ध करून देतील असे दर्जेदार शिक्षण हवेअसा आग्रह आहे . भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाने देखील त्याच धर्तीवर कौशल्य केंद्रित शिक्षण देणे गरजेचे आहे ,ज्या योगे समस्या सोडवण्याची सक्षमता तसेच नवनिर्मिती आणि विविध विषयातील वातावरणाचा अभ्यास होईल असे सांगितलेलं आहे.
जसजसा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि प्रगती होत गेली ज्यामुळे जीवनमान उंचावले आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे बदल घडून आले. ‘डिजिटल इंटेलिजन्ट कोशंट’ नावाचा एक नवीन बुद्धिमत्तेचा प्रकार ओळखला जाऊ लागला. 2019 च्या डिजिटल इंटलिजन्स कोशंटजागतिक स्टॅंडर्ड अहवालानुसार डिजिटल साक्षरता ही जगाच्या मूल्यांमध्ये खोलवर रुतलेली आहे . ज्याचा वापर मानवी जीवनात प्रगतीआणण्यासाठी होईल.
एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञान कौशल्य म्हणजे काय?
नवीन शैक्षणिक धोरण 2020 प्रमाणे ,तसेच नुकत्याच प्रकाशित झालेल्या सीबीएससी बुक 2020 नुसार , एकविसाव्या शतकातीलकौशल्य म्हणजे जी कौशल्य जी माणसाला एकविसाव्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी जागतिक दृष्ट्या सजग राहण्यासाठीडिजिटली ट्रान्सफर होण्यासाठी , एकमेकांना सोबत घेऊन पुढे वाटचाल करण्यासाठी , प्रगती करण्यासाठी अनेक सक्षम मनुष्य आणिस्त्रोत मनुष्यातील स्त्रोत होण्यासाठी आणि नवीन नवीन बदलांना सामोरे जाण्यासाठी गरजेचे आहे त अशी कौशल्ये होय.
सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हे आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये तसेच भारतीय उच्च शिक्षण विभागामध्ये कायमच अग्रेसर असतेयाची जोरदार धडाकेबाज पद्धतीने होणारे आंतरराष्ट्रीयकरण सुरु आहे. यामुळे विविध संस्था आणि विद्यापीठे सोबत एकत्रित पणे उपक्रम करणे सुरु असते . जगभरातील नामांकित आणि प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संघटना – विद्यापीठे यांच्याशी सहयोगी आहे. याविद्यापीठाचा घटक असणारे सिम्बॉयसिस विधी महाविद्यालय पुणे हे विविध उपक्रमातून आंतरराष्ट्रीयकरण्याची धुरा सांभाळत आहे . नुकताच FICC चा २०२१ मधील अंतराष्ट्रीयीकरणाचा पुरस्कार सिम्बॉसिस विधी महाविद्यालयाला मिळालेला आहे. तसेच विविधप्रकारच्या मान्यता विविध प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. नुकताच युरोप मधील प्रतिष्टेचा असणारा ‘जीन मोने चेयर’ सिम्बॉयसिस विधी महाविद्यालयाच्या संचालिका डॉक्टर शशिकला गुरपुर यांना बहाल करण्यात आलेला आहे.
प्रकल्पाविषयी
‘शिक्षकांना जीवन आणि माहिती तंत्रज्ञानाची कौशल्ये शिकवून प्रशिक्षित करणे ‘ हा उदात्त हेतू समोर असणारा हा इरॅस्मस प्लसआणि CBHC प्रकल्प आहे. यालाच २१ TS असेही म्हणतात. २१व्या शतकातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्य शिक्षण देऊन सक्षम करणे हा या प्रकल्पाचा हेतू आहे.
हा प्रकल्प ‘सिम्बायोसिस सेंटर फॉर युरोपियन स्टडीज‘ (SCES ) कडून नियंत्रित केला जाईल. एका स्पर्धेमध्ये हा प्रकल्पसिम्बायोसिस विद्यापीठाला मिळालेला आहे. युरोपियन युनिअन च्या इरॅसमस प्लस कडून याला काही प्रमाणात निधी उपलब्ध होतआहे. तीन वर्ष्यासाठी हा प्रोग्रॅम चालणार आहे. ( २०२०– २०२४) मध्यंतरीच्या की कोरोना महामारी मुळे याला वाढीव मुदत मिळालेलीआहे. या प्रकल्पच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची उद्दीष्ट्ये ( सर्वसमावेशक शिक्षण, न्यायाच्या धर्तीवरील , आणि २१व्याशतकाला साजेसे ) सध्या होतील.
प्रकल्पाचा संघ
ग्रीसमधील ईयोनींना विद्यापीठ हे या प्रकल्पाचे समन्वयक विद्यापीठ आहे. आणि तेथील डॉ. कटरीना पाकीतसी (शिक्षण शास्त्रप्राध्यापक, बालपणशास्त्र विभाग प्रमुख, शिक्षण समूहातील औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण पद्धतीतील मुख्य अन्वेषक ) हेया प्रकल्पाचे व्यवस्थापक आहेत. या प्रकल्पांमधील बाकीचे भागीदार भारतातून सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, पुणे आणिबनस्थळी विद्यापीठ , लीथूनिया मधील क्लपेडा विद्यापीठ , लक्समबर्ग मधील नॉवेल ग्रुप , कुवेत मधील क्लास फेटा विद्यापीठ(नोवेल ग्रुप), चीनमधील साऊथ वेस्ट विद्यापीठ आणि शेन पॉलीटेक्निक विद्यापीठ , कोलंबिया मधील रॉयल युनिव्हर्सिटी ऑफ फोमपेन आणि बटाबंग विद्यापीठ , यांचा समावेश आहे.
प्रकल्पाचे ध्येय व प्रभाव
जीवनभर कामी येणाऱ्या दर्जेदार उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवणे
शिक्षणाचा प्रत्यक्ष्य कामगार संबधी बाजारासोबत संबंध वाढवणे
उच्च शिक्षण संस्थांमधील सक्षमता आणि कौशल्य सुधारणे
आंतरराष्ट्रीय करण आणि नवनवीन क्षमता वाढवणे
शिक्षण विभाग जो उच्च शिक्षण संस्थेचा आहे त्याच्या मधील स्वयंसेवी किंवा स्वतः पुढे येउन अभ्यासक्रम युरोपियन युनिअन चाअभ्यासक्रम शिक्षणामध्ये आणण्यासाठी पुढाकार घेणे
लोकांमधील संबंध वाढवणे
विविध संस्कृती समजून घेऊन जनजागृती करणे ,
भारतातील सेवेमध्ये असणाऱ्या आणि सेवा अजून सुरू असणाऱ्या शिक्षक वर्गाला या कौशल्यांचा फायदा होणार आहे . तसेच इतरआशियाई देशातील शिक्षकांना देखील या कौशल्यांचा फायदा होणार आहे. या प्रकल्पात विद्यार्थी , शिक्षक, शिक्षण क्षेत्रात कामकरणारे , धोरण बनवणारे , आणि अशा प्रकारच्या एकूण एक लाख आशियातील आणि पन्नास हजार भारतीय लाभ घेऊ शकतील.
ऍक्टिव्हिटी क्रमांक एक– गरज आणि अंतर विश्लेषण
2019 मध्ये ‘तीर्व व्यवहार्यता’ चे सर्वेक्षण – (पुणे आणि सांगली येथील) विद्यार्थी शिक्षक यांच्यात सर्वेक्षण केले . वेगवेगळ्याशैक्षणिक मंडळ , सी बी एस सी, आय सी आय सी आय बी, आणि इंग्लिश माध्यमातून आणि मराठी शाळेतील सर्वेक्षण केले.
शिक्षकांचे जे महाराष्ट्र मधून पुणे आणि सांगली येथील प्रश्नावली घेतले गेले त्यातील विद्यार्थी –
शिक्षक– १२५
विद्यार्थी– २८४
शिक्षणतज्ज्ञ– १५
कर्नाटक राज्यामधील दोनशे शाळातील अनोपचारिक सर्वे घेण्यात आला.
विविध प्रकारच्या नियंत्रण करणाऱ्या संस्था , वेगवेगळ्या माध्यमातून शिकवण्या च्य पद्धती असणाऱ्या भिन्न ठिकाणचे सर्वेक्षण केलेगेले.
यामधून असे दिसून आले कि कौशल्य विकास होण्यासाठी सामान्यपणे चे जे प्रकार किंवा जी पद्धत अवलंबली जाते ती एक समानकिंवा रचनात्मक नाही. त्याला अपवाद म्हणजे माहिती तंत्रज्ञान कौशल्य आणि सहयोगी विकास होय. फक्त दहा टक्के शाळा मध्येप्रयोगशाळा आणि देणगीतून उभा करण्यात आलेले शिक्षण आणि संशोधन केंद्रे आहेत. या दहा टक्के शाळा या शाळा आणि आहेत त्या सोडून विद्यार्थी भिमुख , सखोल विचारपूर्वक शिकवणेची तसेच सर्वानी मिळून समस्या निराकरण शिक्षण पद्धती चे प्रमाण नगण्यआहे.
अनुमान/ निरीक्षणे/ बदलाची गरज :
अशाप्रकारे अभ्यासक्रमात मूल्यांकन सूचना देण्याचे , शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची पद्धती जी 21 व्या शतकातील कौशल्य मीमांसाकरून विचार करण्याची पद्धत , सर्वानी मिळून शिकणे, स्वतः पुढाकार घेणे स्वतःला स्वतः दिशा देणे ,परिस्थिती सांभाळून घेणे,इत्यादी बाबींमध्ये आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे . नवीन शैक्षणिक धोरण 2020 येणे आधी पर्यंत याबद्दल कोणतीच चर्चा झालेली नव्हती.
ऍक्टिव्हिटी क्रमांक २– किक ऑफ मीटिंग
ग्रीसमधील युनिव्हर्सिटी ऑफ ईयोनींना यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये ‘किक ऑफ मीटिंग‘ घेतली होती या मिटिंग मध्ये या प्रकल्पाचेसभासद सिंबायोसिस विधि महाविद्यालय, पुणे ज्या चे संचालिका डॉ. शशिकला गुरपूर , प्राध्यापक डॉ. बिंदू रोनॉल्ड , प्राध्यापकडॉ.अपराजिता मोहंती , प्राध्यापक राज अंजनीकुमार वर्मा , प्राध्यापक उज्वल नांदेकर यांनी २१व्या शतकाला गरजेचे आहे असे प्रशिक्षण घेतले होते.
ऍक्टिव्हिटी क्रमांक तीन अभ्यासक्रमाची निर्मिती करणे
मे २०२० पासून ऑक्टोबर २०२१ पर्यंत या प्रकल्पाखाली खालील अभ्यासक्रम तयार करण्यात आलेले आहेत.
मीमांसा करून विचार करणे ,एकत्रित मिळून समस्येचे निराकरण करण्याची कौशल्य, शैक्षणिक तंत्रज्ञान कौशल्य जे शिकवतानातंत्रज्ञानाचा वापर ज्ञानासाठी आहे ,उत्तम प्रकारे शिकण्याची गोष्टी ,शाळेमध्ये वर्गामध्ये प्रात्यक्षिक करणे ,तसेच एकविसाव्याशतकातील मूल्यांकनमध्ये सकारात्मकता, इत्यादी चा समावेश होता. आशिया खंडातील नोकरीमध्ये असणाऱ्या आणि नोकरीमध्येयेणे आधी प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांना याचा लाभ होईल आणि अभ्यासक्रमाच्या सर्व पातळीवर आणि विषयामध्ये मध्ये याचावापर होईल. हा उपक्रम बनस्थळी विद्यापीठ कडून नियंत्रित करण्यात येईल.
यामध्ये सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठाने सखोल विचार करणे , एकत्रित मिळून समस्या निराकरण करणे , खोलवर अभ्यास आणिविविध लोकांचे सहकार्य , कार्यशाळा इत्यादी विविध क्षेत्रातील विद्वानांना घेऊन केलेले आहेत. यामध्ये डॉ के.पी. मोहन ‘थिंकक्यू’ चे सह –संस्थापक ( भाषा शास्त्र पद्धती तज्ज्ञ) , डॉ .मदन मोहन (सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय शाळा चे उपप्राचार्य , विविधशिक्षण पद्धती आणि डिजिटल कोशंट तज्ञ ) त्यासोबत डॉ व्ही. एन. झा (माजी संचालक, संस्कृत विभाग सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ ) सौ कामिनी सक्सेना (शिक्षण तज्ञ , प्राचार्या – कलमाडी शामराव हायस्कूल , कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सेल , तसेच डॉ. सोफिया गायकवाड , विभागप्रमुख, STLRC (सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ) यांचा समावेश आहे.
सखोल विचाराचा मूळ हेतू आहे कि भारतीय पारंपरिक ज्ञानाच्या मदतीने ( मीमांसा, न्याय, बुद्धांची शिकवण, इत्यादी) नवीनआव्हाने आणि पद्धतीचा वापर शिक्षणात करणे हा आहे. यामध्ये पुढे जाऊन नवनवीन घटक मेंटकाँगनेटीव्ह कौशल्ये , सहानभूती, रोजगाराभिमुख कौशल्ये जसे डिजिटल कोशंट , भिन्न प्रकारच्या संस्कृतीमधील सक्षमता , मानवी संधारण , मानस शाश्त्र, इत्यादी घटकांचा समावेश आहे.
ऍक्टिव्हिटी क्रमांक 4 –ट्वेंटी फर्स्ट TS प्रयोगशाळा
ऑक्टोबर २०२० पासून या प्रकल्पाचा एक भाग म्हणून तसेच सामान्यांपर्यंत हा प्रकल्प जे शिक्षक सेवा देण्याच्या आधी आणि सेवादेणारे शिक्षक आहेत यांच्यासाठी ट्वेंटी फर्स्ट एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरी जाणारी कौशल्य प्रयोगशाळा नावाची EU लर्निंग रिसोर्सेस सेंटर याची स्थापना सिम्बायोसिस विधी महाविद्यालय पुणे इथे केली आहे. स्मार्ट बोर्ड, क्लासरूम रिस्पॉन्स सिस्टीम, थ्री प्रो कोर्स मॅनेजमेंट टूल्स , शिकण्याची व्यवस्थापन पद्धती , टॅब्लेट्स , नवीन आलेले संगणक, विषय कसा शिकवायचा याबद्दलची उपकरणे , व्हिडिओ प्रोजेक्ट , आदींचा समावेश होतो ही प्रयोगशाळा युरोपियन युनियन लर्निंग रिसोर्सेस सेंटर चा भाग आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन मोड च्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहोत आणि यांना प्रशिक्षण देण्यासाठी ही सर्व उपकरणेवापरण्यात येतील.
पुढील वाटचाल
नोव्हेंबर 2021 पासून २१ TS चा समावेश मुख्य विषयांत करणे
सिंबायोसिस विधि महाविद्यालय पुणे मधील अभ्यासक्रमामध्ये मुख्य विषयांत या विषयाचा समावेश आधीच केलेला आहे , उदा , लीगल डेटाबेस, आय. सी..टी. आणि एकविसाव्या शतकात लागणाऱ्या कौशल्यास अनुसरून कायद्याच्या संशोधनाचे लिखाण , इत्यादींचा समावेश सर्व अभ्यासक्रमामध्ये केला आहे. कालांतराने सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ या विषयांचा समावेशबाकीच्या विद्याशाखांमध्ये करेल आणि या प्रकल्पाचा विस्तार होईल.
जरी कोविड19 चा परिणाम या प्रकल्पावर झाला होता तरी या प्रकल्पामध्ये सहभागी असणारे सर्व भागीदार लवकरच भेटतील एकमीटिंग होईल आणि त्याद्वारे सक्षमता वाढवणे , प्रकल्प सुरु करणे , विविध शिक्षकांना प्रशिक्षण देणे असा होईल. या दरम्यान मार्च२०२१ मध्ये ग्रीस मधील डॉ. कटरिना ( प्रकल्प व्यवस्थापक) यांचे पुढाकारातून ८०० पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ , इत्यादी नी ‘२१व्या शतकातील शिक्षण – शिक्षक आणि संशेधक यांची गरज ” याविषयी आभासी पद्धतीने कार्यक्रम झालेला आहे. हाकार्यक्रम सिम्बायोसिस विधी महाविद्यालय पुणे यांनी आयोजित केलेल्या ‘भारतीय आणि जागतिक व्यासपीठावरील कायद्याचेराज्य‘ या ९व्या आंतरराष्ट्रीय वार्षिक संशोधक संमीलनामध्ये संपन्न झाला.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत फायदा व्हावा यासाठी ग्रीसमधील ईयोनींना विद्यापीठ ने पुढाकार घेउन INFODAY हा कार्यक्रम ऑनलाइन आणि यूट्यूब च्या माध्यमातून आयोजित करणार आहेत .याची लिंक खालील प्रमाणे आहे.
https://21stteachskills.eu/
विविध क्षेत्रातील तज्ञांनी खालील प्रमाणे विधान केली आहेत.
क्रमांक 1 – डॉ . मनमोहन
हे अमेरिकेच्या एम आय टी मधून पीएचडी आहेत. ते म्हणाले सखोल चौकशी करून घेतले जाणारे शिक्षणामधून सद्सद्विवेक बुद्धीनेएखाद्या विषयाकडे पाहणे ही काळाची गरज आहे. आणि शिक्षण पद्धतीमधील एक महत्त्वाचा भाग होऊन त्याच्याकडे पाहिले जावे.जगातील सर्व शाळांमध्ये सद्सद विवेकबुद्धीने चौकशी करून त्यावर चर्चा केली गेली , मूल्ये , नीतिमत्ता याच्या संकल्पना आणि तत्वेखोलवर पहिली गेली तर कदाचित जगामध्ये हिंसेचे प्रमाण घटेल.
क्रमांक 2- डॉ. सोफिया गायकवाड
एकविसाव्या शतक हे फक्त समाजातील बदलाचे तर विश्वास, मूल्य आणि मानवी जीवनाच्या अस्तित्वातील बदल दाखवणारे शतक आहे. त्यामुळे नवीन बदलांना सामोरे जाताना या पिढीसाठी एकविसाव्या शतकातील शिकण्याचे कौशल्य आत्मसात करणेअत्यावश्यक आहे. या कौश्यल्यामुळे शिकणाऱ्याला विविध पर्याय मिळतील. एक स्रोत मिळेल , चपळता येईल आणि एक माणूसम्हणून देखील ही कौशल्ये उपयोगी पडतील.
क्रमांक 3 विद्यार्थी –अभिषेक जैन (आय बी सिस्टिम चा विद्यार्थी)
जेंव्हा हे विषय वर्गात शिकवले गेले तेंव्हा विषय शिकणेची उत्कंठा वाढली आणि केवळ घोकंपट्टी न करता संकल्पना समजली . सखोल विचार करून आत्मसात केले . जे काही शिकलो ते जीवनाच्या पटलावरती खऱ्या अर्थाने आमलात आणता येईल जोशिक्षणाचा खरा उद्धेश आहे .