गौतम गंभीरला तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी

0

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर याला तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी  देण्यात आली आहे. ISIS काश्मीर या दहशतवादी संघटनेकडून त्याला हा धमकीचा मेल आला आहे. या ईमेलमध्ये दिल्ली पोलिसांचाही उल्लेख करण्यात आला आहे. [email protected] या ईमेल आयडीवरून हा मेल पाठवण्यात आला आहे.

या मेलमध्ये दिल्ली पोलीस आणि IPS श्वेता आमचं काहीही करू शकणार नाहीत. पोलिसांमध्येच आमचे खबरी आहेत. या खबरींकडूनच तुझी सर्व माहिती मिळत आहे ‘ असा दावा या मेलमध्ये करण्यात आला आहे. याअगोदर गौतम गंभीरला मंगळवारी रात्री धमकीचा मेल आला होता. यानंतर गौतम गंभीरने दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती डीसीपी सेंट्रल श्वेता त्रिपाठी यांनी दिली आहे.

गौतम गंभीरने 2007 साली झालेला T20 वर्ल्ड कप
आणि 2011 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती. या दोन्ही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये त्यानं टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन केले होते. तसेच गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलमध्ये दोनदा ट्रॉफी जिंकली होती. यानंतर गौतम गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तसेच गंभीरनं 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.