पिंपरी : पिंपरी येथील हॉटेल जिंजर लगत सुरू असलेल्या ‘Oregano SPA’ सलूनमध्ये हा अवैध धंदा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापेमारी केली.
तेव्हा या कारवाई दरम्यान पोलिसांनी 3 पीडित महिलांची सदर ठिकाणावरून सुटका केली. ज्यामधील 2 महिला नागालँडच्या तर एक महाराष्ट्राची राहणारी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अशा पद्धतीने भर शहरात देह विक्रीचा व्यापार चालवणाऱ्या पती व पत्नी यांना पोलिसांनी अटक केली असून देवेंद्र कुमार झा व स्नेही कुमारी झा अशी या दाम्पत्यांची नावे असून ते मूळचे झारखंड राज्याचे रहिवासी असल्याचीही माहिती पोलिसांमार्फत मिळाली आहे.
या आरोपी दाम्पत्याविरोधात ‘पिटा ॲक्ट’ प्रमाणे पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 3 हजार 800 रुपये रोख, एक मोबाइल फोन व इतर काही साहित्य देखील जप्त केले आहेत.
दरम्यान, महिलांना जबरदस्तीने देहविक्रीच्या गोरखधंद्यात ढकलणाऱ्या आरोपी दाम्पत्यावर कठोरात कठोर कारवाईची आता मागणी केली जात आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केली आहे.