तामिळनाडू : राज्यातील कुन्नूर नजीक भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 कोसळून भीषण दुर्घटना झाली आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी तसेच कुटुंबातील अन्य सदस्य होते.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमध्ये १४ जण प्रवास करत होते. निलगिरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर दोघांना वाचवण्यात यश आले आहे.
दरम्यान भारतीय हवाई दलाने ट्विट करून बिपीन रावत Mi-17V5 मधून प्रवास करत असल्याची पुष्टी केली आहे. दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेशही हवाई दलाकडून देण्यात आले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्याचे काम सुरु झाले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय होते अशी माहिती आहे.
तमिळनाडू येथील कोईमतूर आणि सूलूरच्या दरम्यान, एमआय सीरिजमधील चॉपर क्रॅश झाले आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तत्काळ आग लागली. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार बिपीन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही होत्या. तसेच एका पायलटचाही समावेश होता.