‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत यांचा ‘हेलिकॉप्टर’ अपघातात मृत्यू

रावत यांच्या पत्नीसह 11 जणांचा मृत्यू

0

तमिळनाडू : तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टर मध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यांच्या पत्नी आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकारी यांचाही मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. या हेलिकॉप्टर मध्ये एकूण 14 जण होते पैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ANI च्या हवाल्याने वाहिन्यांवर प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामुळे देशावर शोककळा पसरली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये 14 लोक होते आणि त्यात एक वरिष्ठ अधिकारी सामील होता. अपघातानंतर तिघांना वाचवण्यात यश आले असून सध्या बचावकार्य सुरू आहे. सध्या लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे, मात्र आतापर्यंत कोणत्या लोकांना वाचवण्यात आले आहे, याची माहिती लष्कराकडून देण्यात आलेली नाही.

कुन्नूर नजीक भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 कोसळून भीषण दुर्घटना झाली आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधूलिका रावत, लष्करी अधिकारी हरजिंदर सिंग, गुरसेवक सिंग, जितेंद्र कुमार, विवेक कुमार, साई तेजा, सतपाल व इतर हेलिकॉप्टर मध्ये होते.

भारतीय हवाई दलाने ट्विट करून बिपीन रावत Mi-17V5 मधून प्रवास करत असल्याची पुष्टी केली आहे. दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेशही हवाई दलाकडून देण्यात आले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्याचे काम सुरु झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.