पिंपरी : महाराष्ट्राच्या नेतृत्वाने देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यात एक मोठा वाटा शरद पवार यांचा आहे. जर 26 खासदार असलेल्या राज्याचा खासदार पंतप्रधान बनू शकतो तर 44 खासदार असलेल्या महाराष्ट्राचा का नाही ? असे व्यक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मुंबईतील नेहरू केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी पवारांना शुभेच्छा देत वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केली आहेत.
मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजकीय वर्तुळातील अनेक नेते उपस्थित होते. त्यावेळी खासदार अमोल कोल्हे बोलत होते.
यावेळी कोल्हे म्हणाले, 26 खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातील व्यक्ती का नाही? कोल्हे यांच्या या वाक्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. देशातील कुठल्याही नेत्याला पवारांचं मार्गदर्शन घ्यावे लागत आहे , असे ते म्हणाले. तसेच भुज भूकंपावेळी शरद पवार यांची अटल बिहारी वाजपेयी यांनी वाहवा केली होती. आता मात्र संप्रदायिकांचे हादरे या देशाला बसत आहेत. त्या टोकदार भाल्याने देश रक्त बंबाळ होत आहे. टोकाची भूमिका निर्माण होत आहे त्यामुळे तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
आमच्या नेत्याला ५ लाखांची सूट नको. तुम्हाला हजारो रुपये किमतीचे तैवानी मशरूम खाण्याची गरज नाही, असे टीकास्त्र सोडत बिहार, पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर त्यांचे नेते शरद पवार यांना भेटायला येतात. हर अर्जुन का सारथी हेच ते. तुम्हाला आम्हाला लढावे लागेल. त्यांचा समतेचा विचार मनात घ्यावा लागेल. असे अमोल कोल्हे म्हणाले.