‘म्हाडा’ पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी पिंपरी चिंचवडचा

0

पुणे : पुणे सायबर पोलिसांनीम्हाडाच्या पूर्व परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या तिघांना अटक केली आहे. यामध्ये ज्या कंपनीमार्फत ही लेखीपरीक्षा घेण्यात येणार होती त्या GA Software Technologies Pvt Ltd. कंपनीच्या संचालकाचा समावेश आहे. आरोपींना आज(रविवार) शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 18 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहितीपोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. धक्कादायक म्हणजे यातील मुख्य सूत्रधार हा पिंपरी चिंचवड शहरातीलरहिवाशी आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून याने आणखी काही असे प्रकार केले आहेत का याचा तपास सुरू आहे.

मुख्य सूत्रधार डॉ. प्रितिश दिलीपराव देशमुख (32 रा. महिंद्रा अॅन्थीया, खराळवाडी, पिंपरीचिंचवड, पुणे), संतोष लक्ष्मण हरकळ (42 रा. मिलिनियम पार्क, एमआयडीसी, चिखलठाणा, औरंगाबाद) आणि अंकुश रामभाऊ हरकळ (44 रा. किनगांवराजा, ता. सिंदखेडराजाबुलढाणा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सायबर पोलीस आरोग्य विभागाच्याआणिवर्गाच्या पदांच्यापरीक्षांच्या पेपर फुटीचा तपास करत असताना रविवारी (दि. 12) होणाऱ्याम्हाडाच्या परीक्षेचे पेपर फोडण्याचा प्रयत्न केला जातअसल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथके तयार करुन औरंगाबाद, जालना, बीड, मुंबई, पुणे, ठाणे येथून संशयितांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु करण्यात आली.

दरम्यान, औरंगाबाद येथील संशयितांसोबत संपर्क साधून त्यांच्याकडून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी परीक्षेच्या पूर्वी पेपर फोडूनदेण्याची योजना टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचा संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव आणिइतरांनी आखल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच सध्या पुण्यात राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांनीम्हाडाच्यापरीक्षेला बसलेल्या परिक्षार्थींना पेपर देण्याची तयारी दर्शवल्याचे पोलिसांना समजले.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टार्गेट करिअर पॉईंट संस्थेचा संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचा संचालककृष्णा जाधव आणि त्यांचा साथिदार अंकित चनखोरे यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडेम्हाडाच्यापरीक्षासाठी बसणाऱ्या तीन परिक्षार्थींचे प्रवेश पत्र, त्यांची मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र, कोरे धनादेश, आरोग्य विभागाच्यावर्गासाठीबसलेल्या 16 आणिवर्गासाठी बसलेल्या 35 परीक्षार्थींच्या नावाची यादी आणि प्रवेश पत्रांच्या प्रति मिळाल्याने आरोपींविरुद्ध गुन्हादाखल करुन अटक केली.

तर पुणे आणि ठाणे येथील पथकांनी संशयित संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्यावर पाळत ठेवून त्यांना क्रेटा (एमएच 20 एल 7111) या गाडीतून ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ. प्रितीश देशमुख हा देखील होता. प्रितीश देशमुख हा G.A. Software या कंपनीचा संचालक असून या कंपनीमार्फतम्हाडाच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार होत्या. प्रितीश याची झडती घेतलीअसता त्याच्याजवळ असलेल्या लॅपटॉपमध्येम्हाडाच्या लेखी परीक्षेचे पेपर तसेच लिफाफ्यामध्ये पेन ड्राईव्ह आढळून आला. त्यामध्येम्हाडाच्या लेखी परीक्षेचे पेपरसेट होते.

संशयित संतोष आणि अंकुश हरकळ यांची झडती घेतली असता त्यांच्या मोबाईलमध्येम्हाडाच्या लेखी परीक्षेसंदर्भात संशयास्पदसंभाषण आणि परीक्षार्थींचे प्रवेश पत्र तसेच आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या संदर्भातील याद्या आढळून आल्या. या सर्वांवर सायबरपोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.