पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेना एकत्रित निवडणुका लढण्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे संकेत

0

पिंपरी : आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका राष्ट्रवादी शिवसनेसोबत लढणार की नाही याबाबत अजित पवार यांनी १० डिसेंबर रोजी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर समारोप वेळी मोठं विधान केलं आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे त्यांचा सोबत येण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, शिवसेना राष्ट्रवादीसोबत येण्यास तयार असेल तर राष्ट्रवादी देखील दोन पावलं पुढे सरकेल, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केले. यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीचे संकेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत.

तसेच पक्षांतर्गत बंडखोरी आणि निवडणुकीत होणाऱ्या कुरखोड्यावर बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. माझेही विरोधकांशी चांगले संबंध आहेत, पण मी कधीही निवडणुकीत फिक्सिंग केली नाही, असंही पवारांनी नमूद केलं. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत तशा घटना घडल्या आहेत. यावेळी काही मान घाली घालून तोंडे लपविण्याचा प्रयत्न करत असताना अजितदादांच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटले नाहीत.

अजित पवार म्हणाले, “इथं कुणाचं बळ किती आहे त्याचा आपण पंचनामा करायला नको. प्रत्येकाचं बळ चांगलं आहे त्यामुळे या पूर्वीच्या काहींनी आपण स्वबळावर लढणार आहोत तर अशा त्यांना शुभेच्छा देऊ. परंतु, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांबद्दल राष्ट्रवादीच्या बरोबर जाण्याची आमची तयारी आहे असं वाचलं. अशी भूमिका मित्रपक्ष घेत असतील तर आपण पण दोन पावलं पुढे मागे सरकून जायचं असतं. त्याबद्दलची मानसिकता आपली आहे. जे आपल्या बरोबर येऊ पाहत आहेत त्यांनी पण राष्ट्रवादीची ताकद किती आहे त्या ताकदीच्या प्रमाणात जागा वाटप झाल्यास काहीच अडचण असण्याचं कारण नाही. दोघांचं ध्येय एकच आहे, भाजपला पराभूत करायचं आहे पालिका निवडणुकीत सेना राष्ट्रवादी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याचे संकेत यानिमित्ताने मिळाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.