बैलगाडा शर्यतीच्या आज होणाऱ्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

आमदार महेश लांडगे दिल्लीत तळ ठोकून

0

पुणे : महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याबाबतचा फैसला आज होणार आहे. त्यामुळे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी दोन दिवसांपासूनच दिल्लीत तळ ठोकला आहे.

सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (दि.१५ डिसेंबर) दुपारी १२ वाजता सुनावणी सुरू होणार आहे. या सुनावणीमध्ये बैलगाडा शर्यतीचा अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सीनियर कौन्सिल ॲड. मुकुल रोहतगी बाजू मांडणार आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, अखिल बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी यांनी दिल्लीत ठाण मांडले आहे. तसेच, बैलगाडा शर्यतप्रेमींकडून हा निकाल शेतकऱ्यांच्या बाजुने लागावा म्हणून प्रार्थना करीत आहेत.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, बैलगाडा शर्यत बंदीनंतर आजपर्यंत, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात संदर्भात काम करणाऱ्या अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या सदस्यांना राजकीय सामाजिक प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य केले व मदत केली.

प्रसंगी संघटना व राज्यातील बैलगाडा मालकांना सोबत घेऊन वेळोवेळी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने केली व यातूनच एक राज्यव्यापी मजबूत संघटन उभे राहिले बैलगाडा शर्यत बंदी च्या विरोधात सर्व स्तरावर आवाज उठवला गेला. या सर्व घडामोडीनंतर बैलगाडा शर्यत प्रेमी, संघटना या सर्वांच्या संघर्षाला यश येईल, अशी अपेक्षा आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.