भल्या सकाळी एकावर गोळ्या झाडल्या; दोन गोळ्या लागल्याने गंभीर जखमी

0

पिंपरी : सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे गुरव येथे शनिवारी सकाळी एकावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. यातील दोन गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

योगेश जगताप असे गोळ्या लागून जखमी झालेल्यांचे नाव आहे. मरेकऱ्यांचा अद्याप तपास लागलेला नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार; पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात पिंपळे गुरव येथे हा प्रकार घडला.

योगेश जगताप याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आज दत्त जयंतीनिमित्त जगताप याने काटे पुरम चौकात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान सकाळच्या वेळी मारेकऱ्यांनी येऊन पिस्तुलातुन गोळ्या झाडल्या. यामध्ये जगताप गंभीर जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. मात्र शहरातील कायदा सुव्यवस्था ढसाळताना दिसत आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.