पुणे : पुणे शहर सायबर पोलिसांनी टीईटी परीक्षेतही गैरप्रकार केल्या प्रकरणी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांच्यासह आणखी एकाला अटक केली. तुकाराम सुपेच्या घरावर आणि त्याच्या मेव्हण्याच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरातून 2 कोटी आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणी पुणे पोलिसांनी अद्याप तपास सुरु आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
जानेवारी 2020 च्या परीक्षेत गैरप्रकार महाटीईटी परीक्षेची जाहिरात 2019 मध्ये देण्यात आली होती. त्यानंतर याची परीक्षा जानेवारी 2020 मध्ये झाली होती. त्या शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.तुकाराम सुपे यांच्या घरुन यापूर्वी 90 लाखांचा ऐवज जप्त तुकाराम सुपे याच्या घरातून 88 लाख 49 हजार 980 रोख, पाच ग्राम सोन्याचे नाणे, 5 लाख 50000 हजार रुपयांची एफ डी केल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत.
म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात प्रीतीश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत 2020 च्या टीईटी परीक्षेचे सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. यामुळं टीईटी परीक्षेसंदर्भात चौकशी सुरु करण्यात आली होती. तुकाराम सुपे याने 1 कोटी 70 लाख, प्रीतिश देशमुख याने 1 कोटी 25 कोटी तर अभिषेक सावरीकर याने 1 कोटी 25 लाख असे एकूण 4 कोटी 20 लाख रुपये घेतल्याचं चौकशीत कबुल केलं आहे. त्यापैकी 90 लाख रुपये जप्त करण्यात आलेत.