‘टीईटी’ परीक्षा घोटाळा प्रकरणात विभागीय आयुक्त सुखदेव डेरे आणि अश्विनकुमार या दोघांना अटक

0

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहाराचे लोण आता माजी आयुक्तांपर्यंत पोहचले असून टीईटीच्या २०१८ च्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक केली आहे. त्याच्याबरोबरच जी. ए. सॉफ्टवेअर तत्कालीन संचालक अश्विनकुमार यालाही पोलिसांनी बंगलुरु येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे.

सुखदेव डेरे हे २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा मंडळाचे आयुक्त होते. २०१८ च्या टीईटी पेपर फोडण्यामध्ये डेरे याचाही हात असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे.

डॉ. प्रीतिष दिलीप देशमुख याच्या अगोदर जी ए सॉफ्टवेअरच्या महाराष्ट्राची जबाबदारी अश्विनकुमार याच्यावर होती. त्याच्याशी संगनमत करुन डेरे व तुकाराम सुपे यांनी परीक्षार्थींकडून एजंटांमार्फत पैसे घेऊन त्यांना पास केल्याची माहिती समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.