मुंबई : आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणात बीड जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचा पाटोदा येथील माजी अध्यक्ष संजय सानप याला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून संजय सानप याची चौकशी चालू होती. पेपर फुटी प्रकरणात त्याचा सहभाग आढळून आल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी त्याला अटक केली असून 23 डिसेंबरपर्यंत संजय संपला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पेपरफुटीवरून प्राकरणापासून सुरू झालेला या तपासात अनेक घोटाळे समोर आले आहेत, असे आणखी घोटाळे समोर येऊ शकतात. ही तर सुरुवात आहे, असे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटले होते. दरम्यान पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 18 जणांना ताब्यात घेतले आहे. तर याहून धक्कादायक बाब म्हणजे सानप याने त्याच्या बीड मधील मूळ गावातील अनेक मुलांना नोकरीला लावले असल्याची माहिती समोर आली आहे
म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणात इतर परीक्षांमध्ये झालेले गैरप्रकारही समोर येत आहेत. महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. या कारवाईत 88 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. त्यानंतर काल पुन्हा पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली असता सुपेंच्या घरातून 1 कोटी 58 लाख रोख आणि आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान पेपर फुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीस ठाण्याचे 70 कर्मचारी आणि २० अधिकारी कार्यरत आहेत. त्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांसोबत युनिट वन आणि युनिट फोरचे अधिकारी देखील या प्रकरणाचा तपास करणार आहेत.