मुंबई : कोरोनाच्या दोन्ही लाटेनं नागरीकांना हतबल करून टाकलं होतं. यानंतर परिस्थिती पुर्वपदावर आली. दरम्यान यंदा कोरोना विषाणूचे काही रुग्ण आढळून येत आहेत. याची खबरदारी म्हणून राज्य सरकारने उद्याच्या नाताळसणाच्या पार्श्वभुमीवर नवीन नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या नव्या नियमानूसार मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने सण साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने सर्वत्र शिरकाव केला आहे. या विषाणूचा महाराष्ट्रातही शिरकाव झाला. याची खबरदारी म्हणून राज्य शासनाने उद्या साजरा होणाऱ्या नाताळ सणासाठी नियमावली लागू केली आहे. नाताळ सण साजरा करण्यासाठी ठराविक नियमांचं सर्वांना पालन करावं लागणार आहे. याचबरोबर राज्यात सावधानतेचा उपाय म्हणून काही निर्बंध देखील लावण्यासाठी चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर नाताळ सणासाठी आखून दिलेल्या नियमावलीचं पालन करत नागरिकांनी प्रशासनाला मदत करत कोरोना नियंत्रणात ठेवण्याच्या या युद्धात हातभार लावावा असं देखील सांगितलं आहे.
नाताळ सणासाठी नियमावली –
– ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीही नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने करावा.
– स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मासमध्ये 50 टक्के लोकांची उपस्थिती बंघणकारक.
– कोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी.
– सुरक्षित शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंगचं) पालन करण्यासोबतच चर्च परिसराचं नियमितपणे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करणं अनिवार्य.
– चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्कचा वापर बंधनकारक.
– चर्चमध्ये प्रभू येशुचं स्तुतीगीत गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा समावेश करावा. त्यावेळी विविध माईकचा वापर करावा.
– चर्चच्या बाहेर परिसरात दुकाने अगर स्टॉल लावण्यास प्रतिबंध.
– कोणत्याही प्रकारे गर्दीला आकर्षित करणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि मिरवणूक नाही.
– फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊ नये.