थंडीत पाऊस, राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट

0

पुणे : सोमवार (दि.27) पासून वायव्य भारतात आणि मंगळवार (दि.28) पासून मध्य भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्याने विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट निर्माण झालं आहे. भारतीय हवामान विभागाने काही जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. खरीप हंगाम अवकाळी पावसामुळे वाया गेला तर रब्बी हंगामावरही अवकाळी पावसाचे ढग जमा होऊ लागले आहे. त्यामुळे वर्षाचा शेवट देखील निसर्गाच्या संकटाला तोंड देण्यात जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’
हवामान विभागाने येत्या दोन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल तर नाशिक, धुळे, बीड आणि नांदेड या चार जिल्ह्यांत अंशत: ढगाळ वातावरण राहील. तसेच या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात बुधवारी (दि.29) कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. बुधवारी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उद्या 26 डिसेंबरपासून वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता. राज्यात खाली दर्शविल्या प्रमाणे 28-29 डिसेंबरला
काही जिल्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.
-IMD
Pl see IMD Updates. pic.twitter.com/Y3M0zBMY4c

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 25, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.