पिंपरी : जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट करून अज्ञातांनी एटीएम मशीन चोरून नेले. ही घटना आज (रविवारी, दि. 26) पहाटे चार वाजताच्या सुमारास चिंबळी येथे घडली.
पोलीस उप मंचक इप्पर यांनी याबाबत माहिती दिली. चिंबळी येथे अॅक्सीस बँकेचे एटीएम आहे. याच परिसरात रात्री गस्तीवर पोलीस होते. पोलीस गेल्यानंतर अज्ञातांनी जिलेटीनच्या कांड्यांचा एटीएम सेंटरमध्ये स्फोट केला आणि एटीएम चोरून नेले.
एटीएममध्ये मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांवर पाळत ठेऊन चोरट्यांनी हा प्रकार केला आहे. पोलीस उपायुक्त स्वतः रात्रगस्तीवर होते. मात्र पोलीस अधिकारी परिसरात येऊन गेल्यानंतर चोरट्यांनी हा प्रकार केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बँकेच्या अधिका-यांकडून एटीएम बाबत माहिती घेतली जात आहे.