नगरसेवकाच्या सांगण्यावरून ‘ती’ कारवाई

राम वाकडकर यांचा गंभीर आरोप

0

वाकड : वाकड येथील हनुमान मंदिराच्या आवारातील पाडण्यात आलेले बाथरूम हे एका नगरसेवकाच्या सांगण्यावरून पाडण्यात आले असल्याचा आरोप भाजपचे राम वाकडकर यांनी केला आहे.

सध्या निवडणुका तोंडावर आल्याने अनेकजण स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि श्रेयवादासाठी सर्वस्वी प्रयत्न करत आहेत, त्यामूळे एखाद्या विषयावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. नुकतीच वाकड येथे हनुमान मंदिर परिसरातील बाथरून पाडण्यावरून वाकडमध्ये वातावरण गरम झाले आहे.

यावर राम वाकडकर म्हणाले, हनुमान मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी मंदिराच्या शेजारी बाथरूम बांधण्याचे काम सुरू होते. परंतु राजकीय सूडबुद्धीने येथील एका नगरसेवकाने महापालिका प्रशासनाला हाताशी धरून हे काम पाडले आहे. इतकी तत्परता 5 वर्ष गावच्या विकासासाठी दाखवली असती तर आज आत्मपरीक्षण करण्याची त्या नगरसेवकावर वेळ आली नसती. ही दाखविलेली सूडबुद्धी नागरिक कधी विसरणार नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.