पिंपरी : युवा नेते नवनाथ ढवळे यांनी भरविलेल्या ‘अटल करंडक 2021’ या फुल्ल पिच क्रिकेट स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परिसरातील 26 संघांनी सहभाग नोंदवला असून या स्पर्धेचे उदघाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झाले आहे.
शुक्रवारी 31 डिसेंबर 2021 ते 2 जानेवारी 2022 असे तीन दिवशीय सामने असणार आहेत. पुनावळे-ताथवडे-विनोदे वस्ती परीसरातील सोसायटी संघांचा यामध्ये सहभाग आहे. आमदार लक्ष्मण जगताप व शहराचे युवा नेते शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या “ अटल कंरडक २०२१” या स्पर्धेत खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला आहे. यामुळे या स्पर्धेचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
उद्घाटन सोहळा प्रसंगी शहर भाजपा ऊपध्यक्ष काळूराम बारणे, स्विकृतसदस्य मा सदिंप गाडे, सिनेट सदस्य (पुणे विद्यापीठ ), संतोष ढोरे, ग्रामस्थ, स्पर्धक मोठया संख्येने उपस्थित होते. परितोषक वितरण सोहळ्यास आमदार लक्ष्मण जगताप आणि शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.