वाकड मधील बारचा धक्कादायक प्रकार समोर; पोलिसांनी केली कारवाई

0

पिंपरी :  31फर्स्ट डिसेंबरनिमित्त हॉटेल आणि बार पहाटेपर्यंत सुरु असणाऱ्या वाकड येथील एका बारवर वाकड पोलिसांनी कारवाई केली आहे. या दरम्यान या बारचा परवाना वेगळा आणि बिल वेगळे असे निदर्शनास आले आहे. यामुळे राज्य शासनाचा जीएसटी (GST) करही बुडविला जात होता. तसेच ग्राहकांचीही फसवणूक केली. पोलिसांनी बारमालकावर फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला. फसवणुकीच्या गुन्ह्यासह दारुबंदी कायदा, महाराष्ट्र कोविड कायदा २०२०, साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांर्तगंत अशा पाच कायद्यान्वये तो दाखल करण्यात आला.

दी मजेस्टीक लाऊंज अँड बार आतून सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बारवर धाड टाकताच हा बार बाहेरुन बंद तर आतून सुरु असल्याचे आढळून आले. कोरोनाचे नियम तेथे पायदळी तुडविण्यात आले होते. त्यामुळे,त्याबद्दल तीन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

बारमालकाची अधिक चौकशी केली असता पिंपळे निलख येथील आदिनाथ गोपी लाऊंज अॅन्ड बारच्या नावे हा बार दी मजेस्टीक लाऊंज अॅन्ड बार या नावाने चालविण्यात येत असल्याचे आढळले. ग्राहकांना बिलेही मजेस्टिकचीच दिली जात होती. त्यातून करचुकवेगिरी करून शासनाचीच नाही, तर ग्राहकांचीच फसवणूक सुरु होती.

म्हणजे एकीकडे ते ग्राहकांकडून जीएसटी कर वसूल करीत होते. पण, बिल दुसऱ्या नावे म्हणजे परवाना नसलेल्या नावे देत असल्याने वसूल केलेला कर भरण्याचा प्रश्नच येत नव्हता. अशा प्रकारे त्यांनी आतापर्यंत लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

बारचा व्यवस्थापक अनुराग सुभाष भिलारे (रा. शुक्रवार पेठ, पुणे) याला अटक करण्यात आली असून मालक चिराग संदीप थोरवे (रा. वाकड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघे फरार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.