पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात फेरबदल, बदल्या
१२ निरीक्षक, ११ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या बदल्या
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पुन्हा एकदा फेरबदल करण्यात आलेले आहेत. १२ पोलीस निरीक्षक आणि ११ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या नियुक्त्या, अंतर्गत बदल्या केल्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी सायंकाळी उशिरा काढले आहेत. विशेष म्हणजे या बदल्यामध्ये निगडी पोलीस ठाण्यातील ओटास्कीम भागासाठी आणि शस्त्र विरोधी पथकासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक देण्यात आलेले आहेत. तर सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्याकडे प्रशासन आणि विशेष शाखेचा पदभार दिला आहे.
पोलीस निरीक्षक रावसाहेब बापूराव जाधव यांची देहूरोड पोलीस ठाण्यातून पोलीस कल्याण शाखेत, राजेंद्र बर्गे यांना नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे, मनोज खंडाळे यांना नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा येथे सलग्न करण्यात आले आहे. तर नियंत्रण शाखेत असणारे निरीक्षक रंगनाथ बापू उंडे यांची पिंपरी वाहतूक विभाग, डॉ. अमरनाथ वाघमोडे यांची तळवडे वाहतूक शाखा, विजया कारंडे यांची निगडी वाहतूक शाखा, शंकर डामसे यांची निगडी पोलीस ठाणे (ओटा स्कीम), सुनील पिंजण यांची शस्त्र विरोधी पथक, वर्षाराणी पाटील यांची देहूरोड पोलीस ठाणे, ज्ञानेश्वर काटकर यांची गुन्हे शाखा युनिट १ तर मच्छिंद्र पंडित यांची गुन्हे शाखा युनिट ४ येथे बदली करण्यात आली आहे. तर निरीक्षक प्रसाद गोकुळे यांची एमओबी/ पीसीबी या ठिकाणी बदली केली आहे.
सहायक निरीक्षक गणेश पवार यांची पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, वाचक ते आर्थिक गुन्हे शाखा, अंबरीश देशमुख यांची गुन्हे शाखा युनिट ४ ते शस्त्र विरोधी पथक, नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक तुकाराम शेळके यांची पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, वाचक, महेश मुळीक यांची चिखली, श्रीनिवास दराडे यांची सांगवी, स्वप्नील वाघ यांची चिखली, शरद शिंपणे यांची तळेगाव, पौर्णिमा कदम यांची भोसरी, एमआयडीसी, प्रशांत रेळेकर यांची विशेष शाखा (ऐटोसी पथक), बाळासाहेब आढारी यांची विशेष शाखा आणि ज्ञानदेव लांडे यांची चाकण पोलीस ठाण्यात बदली करण्यात आलेली आहे.