पिंपरी चिंचवड महापालिकेत मेगा भरती ! 4292 पदांची होणार भरती

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेत मेगा भरती होणार आहे. महापालिकेच्या ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. महापालिकेचा नव्याने आकृतिबंध तयार करण्यात आला असून राज्य सरकारने अस्थापनेवरील सरळ सेवेने वेगवेगळी पदं भरण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारने महापालिका अस्थापनेवरील पदे भरण्यास परवानगी दिल्याने 4292 पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया महापालिका स्वत: राबविणार आहे.

पालिका आस्तापनेवरील नोकरभरती करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. 14 डिसेंबरला महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासकीय खर्च 35 टक्के मर्यादेच्या आत राहील याची आयुक्तांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना नगरविकास विभागाने महापालिकेला दिली आहे. त्यामुळे महापालिका लवकरच नोकर भरती करणार आहे. त्या दृष्टीने प्रशासन विभागाने तयारी सुरु केली आहे.

खासगी संस्थेच्या माध्यमातून भरती करत असताना अनेक गैरप्रकार घडत आहेत. यामुळे महापालिकेने ही भरती प्रक्रिया स्वत: राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका प्रशासनाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दिली.महापालिकेकडून वैद्यकीय, आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा ल या अत्यावश्यक विभागातील पदांची भरती केली जाणार आहे.

यामध्ये लिपिक, प्रशासन अधिकारी, अभियंता आणि अन्य आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.