पुणे : आंबेडकर चौकातील एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत एकूण १५ जणांना अटक केली असून ३१,६१०/- रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे.
रियाझ चांद उस्ताद (रा. बोपोडी, पुणे), संजय भारत चेंडके (रा. उत्तमनगर, पुणे), संतोष सुखदेव भालेराव (रा. सर्वे नं. ३५, देहूरोड, पुणे), अमोल कल्लापा कांबळे (रा. देहूरोड, पुणे), सुहास शिंदे (रा. कासारवाडी, पुणे), रामदेव बुधआराम बिष्णोई (रा. लोणीकळभोर, पुणे), हनुमंत महादेव बिराझदर (रा. देहूरोड, पुणे), शिवाजी भागवत कांबळे (रा. काळेवाडी फाटा, पुणे), राम काशिनाथ परते (रा. पिंपळे गुरव, पुणे), समुआल सुनील पाटोळे (रा. खडकी, पुणे), दिनेश राहुल खरात (रा. चिखलवाडी, खडकी, पुणे), रामनाथ रंगनाथ पवार (रा. ताथवडे, पुणे), योगेश रमेश जाधव (रा. पिंपळे निलख, पुणे), कुणाल देवराज पिले (रा. कांबळे वस्ती, खडकी, बोपोडी, पुणे), श्रीकांत विठ्ठल जाधव (रा. दापोडी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेडकर चौकातील अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बेकायदेशीर जुगार चालू असल्याबाबतची सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने त्या ठिकाणी छापा टाकला असता आरोपी रियाझ चांद उस्ताद, संजय चेंडके व संतोष भालेराव हे पाहिजे असलेला आरोपी मनोज सूर्यवंशी याच्या जुगार अड्ड्यावर बेकायदेशीरपणे १३ पानी पत्त्यांचा रमी जुगार खेळत असताना मिळून आले. तसेच बाकीचे आरोपी बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याजवळून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण ३१,६१०/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी करीत आहेत.