स्मृती मानधना दुसऱ्यांदा ठरली ICC वुमन क्रिकेटर ऑफ द इयर

0

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिची आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्मृतीला दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी 2018 मध्ये तिला हा पुरस्कार मिळाला होता.

भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने गेल्या वर्षी एक शतक आणि 5 अर्धशतके झळकावत 22 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 38.86 च्या सरासरीने 855 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताने घरच्या मैदानावर 8 पैकी फक्त दोनच सामने जिंकले. या दोन्ही सामन्यात संघाच्या विजयात स्मृतीने महत्त्वाची भूमिका बजावली.

𝗦𝗵𝗲 𝗵𝗮𝘀 𝘄𝗼𝗻 𝗶𝘁… 𝗔𝗚𝗔𝗜𝗡! 🙌 🙌

Heartiest Congratulations to #TeamIndia’s @mandhana_smriti who wins the ICC Women’s Cricketer of The Year 2021. 👏 👏 pic.twitter.com/ePsRgXcolA

— BCCI Women (@BCCIWomen) January 24, 2022

दरम्यान, पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची आयसीसी प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. इंग्लंडचा कसोटी कप्तान जो रूटला आयसीसीचा कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर (पुरुष) म्हणून घोषित करण्यात आले. तर बाबर आझम 2021 मधील एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू (पुरुष) ठरला.

Leave A Reply

Your email address will not be published.