वाकड प्रीमियर लीग : रॉयल कोर्ट, डायनॅस्टी डेअरड्रीमर्स आणि वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघ विजेते

0

पिंपरी  : वाकड परिसरातील सोसायटी सभासदांकरिता विनायक गायकवाड युथ फाऊंडेशनमार्फत आयोजित वाकड प्रीमियर लीग क्रिकेटचे यंदाचे मानकरी
रॉयल कोर्ट, डायनॅस्टी डेअरड्रीमर्स आणि वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघ ठरले आहेत.

माजी नगरसेवक शंकर जगताप व माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या हस्ते चषक वितरण सोहळा पार पडला.

वाकड परिसरातील सोसायटी सभासदांकरिता विशेषतः आय टी वर्गाकरिता वाकड परिसरात विनायक गायकवाड युथ फाऊंडेशनच्या वतीने गेले चार वर्षांपासून वाकड प्रीमियर लीग क्रिकेट सामने आयोजित केले जातात. यंदाचे पाचवे पर्व असल्याने नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. २०१७ साली ५७ संघांपासून सुरु झालेले पर्व यंदा पाचव्या पर्वात पदार्पण केले असता या पर्वात १५३ संघ सहभागी झाले. त्यामध्ये पुरुष संघ १२६, महिला संघ २४ व ज्येष्ठ नागरिकांचे ३ संघ सहभागी झाले होते. या वर्षी महिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला.

वाकड प्रीमियर लीग पाचव्या पर्वाचे पुरुष संघाचे प्रथम मानकरी रॉयल कोर्ट सोसायटीचे आरसीसी क्रिकेट क्लब ठरले. त्याचप्रमाणे महिला संघाचे मानकरी डायनॅस्टी सोसायटीचे डायनॅस्टी डेअरड्रीमर्स हा संघ ठरला व ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघ प्रथम विजेता ठरला. पुरुष संघामध्ये द्वितीय पारितोषिक कल्पतरू स्प्लेंडर सोसायटी संघाने पटकाविले व तृतीय पारितोषिक वेणूनगर संघाने पटकाविले. महिला संघांमध्ये द्वितीय पारितोषिक स्विस काऊंटी सोसायटी संघाने पटकाविले व तृतीय पारितोषिक मालपाणी ग्रीन्स सोसायटी संघाने पटकाविले.

Leave A Reply

Your email address will not be published.