नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीतून संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नौदल आणि लष्कराच्या तीन जवानांनी विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पिडित महिलेनं दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून दिल्ली पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
याबाबत माहिती अशी की, महिला तिच्या घराजवळील एका पार्कमध्ये फिरत होती, त्यावेळी शेजारी राहणारा 1 आरोपी तेथे पोहोचला आणि कुटुंबाला भेटण्याच्या बहाण्यानं घरी येण्यास सांगितले. पीडितेने नकार दिल्यानंतरही आरोपीनं तिला जबरदस्ती करत घरी घेऊन गेला. त्याचा एक मित्र घरी आधीच हजर होता. दोघांनी महिलेवर बलात्कार केला आणि व्हिडिओही बनवला. याबाबत कोणाला सांगितल्यास हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होईल. अशी धमकीही त्यांनी दिली. यानंतर महिला तिच्या घरी गेली.
2 महिन्यांनंतर पीडिता काही कामानिमित्त घराबाहेर पडली होती, आरोपीने तिला पुन्हा एकदा पकडून मुनिरका येथे नेले आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. येथे त्याने आधी एका घरात नेऊन स्वत: बलात्कार केला आणि त्यानंतर मित्रालाही बोलावलं मित्रानंही पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर महिला पतीसह गावी परतली. नंतर दिल्लीला येण्यास नकार दिला. पतीने कारण विचारले असता. महिलेने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर पतीनं तिला पोलिसांत तक्रार करण्यास सांगितलं. यानंतर महिलेनं तक्रार दाखल केली आहे.