निष्क्रिय पोलिसांमुळेच तळेगावात अल्पवयीन युवतीवर हल्ला : चित्रा वाघ

महिलेने गुन्हा नोंदविण्यास पुढे यायला अपार धैर्य लागते; निराश करु नका : पार्थ पवार

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगांव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीवर भरदिवसा हातोडा घालून हल्ला करण्यात आला. याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. पोलिसांच्या निष्क्रियपणामुळेच हा हल्ला झाल्याची टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर केली. तर पार्थ पवार यांनी या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुली व महिलांवर वाढत असलेले अत्याचार ही चिंतेची बाब असून असे गुन्हे रोखण्यासाठी शक्ती कायद्या लवकरात लवकर लागू होणे गरजेचे असल्याचे मत विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.


तळेगाव येथे भरदिवसा अल्पवयीन मुलीवर तरुणाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस स्टेशनला विनयभंगाची तक्रार दाखल केल्याच्या रागातून शिवम शेळके (20, रा. तळेगाव स्टेशन) या तरुणांने एका 17 वर्षीय मुलींच्या डोक्यात हातोडीने वार करत तिला गंभिर जखमी केल्याची घटना गुरुवारी तळेगाव बाजार भागात घडली.

शिवम हा पीडित मुलीला त्रास द्यायचा, याबाबत मुलीने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सदर मुलाला ताब्यात घेत त्याचे समुपदेशन केले तसेच सर्व कायदेशीर बाबी पुर्ण झाल्यानंतर त्या सोडले असता त्याने पुन्हा हा प्रकार केला. हातोडीने वार करून तो पळत असताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अल्पवयीन मुलीला सतत एका माथेफिरू कडनं त्रास त्याच्या वांरवार पोलिस स्टेशनला तक्रारी दिल्या, पोलिसांनी ना दखल घेतली ना कारवाई केली, आज भरदिवसा बाजारात त्याने मुलीच्या डोक्यात हातोडा मारला, दखल घेतली असती तर हा हल्ला टाळता आला असतां ना, तात्काळ निष्क्रीय पोलिसांवर कारवाई करा असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे. 

तर पार्थ पवार म्हणाले की, तळेगाव दाभाडे येथे छेडछाडीची तक्रार करणाऱ्या अल्पवयीन युवतीवर हल्ला होणे ही अस्वस्थ करणारी घटना आहे. या भीतीनेच तक्रार देण्यास टाळाटाळ होते. तक्रार दिल्यावर संरक्षण मिळेल ही खात्री आता करावी लागेल. गुन्हा नोंदवण्यास महिलेने पुढे यायला अपार धैर्य लागते. त्यांना निराश करून चालणार नाही. तळेगाव दाभाडे येथे छेडछाडीची तक्रार करणाऱ्या अल्पवयीन युवतीवर हल्ला होणे ही अस्वस्थ करणारी घटना आहे.याभीतीनेच तक्रार देण्यास टाळाटाळ होते. तक्रार दिल्यावर संरक्षण मिळेल ही खात्री आता करावी लागेल.गुन्हा नोंदवण्यास महिलेने पुढे यायला अपार धैर्यलागते.त्यांना निराश करून चालणार नाही.

मुली व महिलांवर वाढत असलेले अत्याचार ही चिंतेची बाब असून असे गुन्हे रोखण्यासाठी शक्ती कायद्या लवकरात लवकर लागू होणे गरजेचे असल्याचे मत विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. तसेच कुटुंबातून देखील मुलांवर संस्कार होणे गरजेचे आहे. एखादी गोष्ट मिळाली नाही तर मुले आक्रस्ताळेपणा करतात. त्यावेळी पालकांनी मुलांमध्ये संयम व विवेक राहण्यासाठी संस्कार करणे आवश्यक असल्याचे मत देखील डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केले. असे होत नसेल तर शक्ती कायदा लवकर लागू होणे आवश्यक असल्याचा पुनरुच्चार डॉ गोऱ्हे या घटनेच्या अनुषंगाने केला.

Leave A Reply

Your email address will not be published.