पुणे : राज्य निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील महापालिका निवडणुकीच प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना 1 फेब्रुवारीला प्रसिद्ध केली जाणार असून हरकती व सूचना, त्यावरील सुनावणी व अन्य कायदेशीर सोपस्कार पार पाडून ती 2 मार्च रोजी ती अंतिम केली जाणार आहे. यानंतर आरक्षण सोडत काढली जाणार असून त्यानंतरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान पुणे महापालिके मध्ये 58 प्रभाग असतील व प्रत्येक तीन सदस्यीय प्रभागाची सरासरी लोकसंख्या 61 हजार 669 च्या आसपास असेल. निवडणूक आयोगाने 2011 या वर्षाची जनगणना अर्थात 35 लाख 56 हजार 824 ही समोर ठेवून ही रचना केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात साधारण मतदार संख्या ही 56 हजारांच्या आसपास राहणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 28 जानेवारी रोजी यासंदर्भातील आदेश निवडणूक होणाऱ्या महापालिकांना दिले आहेत. हे आदेश मागील दोन दिवसांत सर्व महापालिकांना टप्प्या टप्प्याने पाठविण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेसाठी 173 जागांसाठी जाहीर केलेल्या 58 प्रभागांपैकी 57 प्रभाग हे त्रिसदसीय राहणार असून त्यामध्ये सर्वांत कमी लोक संख्या असलेला प्रभाग 55 हजारांचा असेल तर सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रभाग हा 66 हजारचा असेल. तर एकमेव द्विसदस्यीय प्रभाग हा प्रभाग क्र. 13 हा राहणार असून त्याची मतदार संख्या 37 हजार 589 आहे.
58 प्रभागांमधील 173 जागांपैकी 23 जागा या अनुसूचित जातींसाठी राखीव असतील. त्यापैकी 12 जागा महिला व 11 जागा पुरुषांसाठी राखीव राहतील. तर अनुसूचित जमाती साठी 2 जागा राखीव असतील. पुरुष आणि महिला उमेदवारीसाठी प्रत्येकी एक जागा राहील.
173 जागांपैकी 50 टक्के आरक्षणानुसार 87 जागा या महिलांसाठी राखीव राहणार आहेत.
प्रभाग 1 आणि 14 मध्ये प्रत्येकी एक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव राहणार आहे.
अनुसूचित जमाती एकूण
लोकसंख्या : 4 लाख80 हजार 17
अनुसुचित जातीसाठी राखीव असलेले
प्रभाग क्र. : 20, 48, 50, 8, 27, 26, 9, 7, 37, 38,1, 22, 10, 39, 21,19, 46, 4, 12, 3, 40, 35
अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्या 41 हजार 561
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले प्रभाग क्र. 1 आणि 14.
असा असेल प्रभाग रचना अंतिम करण्याचा कार्यक्रम
– मंगळवार 1 फेब्रुवारी – प्रारूप प्रभाग रचना हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करणे.
– सोमवार 14 फेब्रुवारी – हरकती व सूचना मागविण्याची अंतिम तारीख.
– शनिवार 16 फेब्रुवारी – हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे.
– बुधवार 26 फेब्रुवारी – हरकती व सूचनांवर प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेण्याची अंतिम तारीख.
– 2 मार्च – हरकती व सुचनांवरील सुनावणी नंतर विवरणपत्र शिफारशीसह निवडणूक आयोगाला सादर करणे.