पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीचे प्रभाग रचनेचे प्रारुप आराखड्याचे नकाशे महापालिका मुख्य प्रशासकीय कार्यालय आणि आठ क्षेत्रीय कार्यालयात उद्या (मंगळवारी) सकाळी दहा वाजता प्रसिद्ध केले जाणार आहेत. तसेच हे नकाशे महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर देखील ऑनलाइन पाहता येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक तीनसदस्यीय पद्धतीने होणार आहे. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे मंगळवारी सकाळी दहा वाजता प्रसिद्ध केले जाणार आहेत. 46 प्रभागांचा एक मोठा नकाशा प्रसिद्ध केला जाणार आहे. प्रभागनिहाय 46 नकाशे प्रसिद्ध केले जाणार आहेत. या आराखड्यावर उद्यापासून 14 फेब्रुवारी पर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. महापालिकेतील तळमजल्यावरील निवडणूक विभागाच्या कार्यालयात नागरिकांना हरकती नोंदविता येणार आहेत. तसेच क्षेत्रीय कार्यालयातही नागरिक हरकती नोंदवू शकतात, अशी माहिती निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.
# निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्धी देणे 1 फेब्रुवारी 2022
# प्रारुप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागण्याचा कालावधी 1 ते 14 फेब्रुवारी 2022
# प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे 16 फेब्रुवारी
#राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचना यावर सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक 26 फेब्रुवारी
#सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठवण्याचा दिनांक 2 मार्च 2022