पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी अनिल परबांना कोण देत होतं ?

0

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर आता परमबीर सिंह यांनी ईडीसमोर आणखी एक धक्कादायक जबाब नोंदवला आहे.

सिंह यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह देशमुख यांची नावे घेतली आहेत. सचिन वाझेला खात्यात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह 2 मंत्र्यांचा दबाव असल्याचा देखील त्यांनी आरोप केला.

बडतर्फ पोलिस अथिकारी सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्यासाठी आणि त्याला गुन्हे शाखेतील महत्त्वाचे पद महत्त्वाचे गुन्हे तपासाला देण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव टाकला होता. पोलीस खात्यात परतण्यासाठी देशमुख यांनी आपल्याकडे 2 कोटींची मागणी केल्याचे पुढे वाझे याने सांगितले होते,

असा धक्कादायक आरोप परमबीर सिंह यांनी आपल्या जबाबात नोंदवला आहे. सचिन वाझे हा त्याच्याकडील तपासाधीन गुन्ह्यांची माहिती त्याच्या वरिष्ठांना देत होता. पुढे वरिष्ठांकडून ती माहिती मला दिली जायची अथवा वाझे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत येऊन माहिती देत होते. असं परमबीर यांनी ईडीकडे नोंदविलेल्या जबाबात म्हटले आहे.

गृह सचिवांच्या नेतृत्वाखाली असलेल्या समितीमध्ये मी सहभागी होतो. पोलीस बदल्यांमध्ये याद्या तयार करण्यात आल्यानंतर फक्त नावासाठी याद्या समितीसमोर येत होत्या. तसेच मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांच्या याद्याही गृह मंत्रालयातून येत होत्या. यातील काही याद्या परमबीर यांनी ईडीला दिल्या आहेत. तसेच परमबीर यांनी या याद्या अनिल देशमुख यांच्यासह मंत्री अनिल परब यांच्याकडून अंतिम होऊन यायच्या असा देखील आरोप केला आहे.

यानंतर आता भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर  यांनी शंका उपस्थित करत ट्वीट केलं आहे की, “बदल्यांची यादी देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं ?, असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.