मौजमजा करण्यासाठी दुचाकीची चोरी; चोरट्यांकडून 4 बाईक जप्त

0

पिंपरी : मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एचपी चौक, म्हाळुंगे येथे नाकाबंदी दरम्यान 31 जानेवारी रोजी म्हाळुंगे पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीकडून 4 बाईक जप्त करण्यात आल्या आहेत.

कानिफनाथ विश्वनाथ धनवटे (वय 32, रा. शिवसाईनगर, ता. हवेली, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे पोलिसांच्या वतीने एचपी चौक, म्हाळुंगे येथे नाकाबंदी करून वाहन तपासणी करण्यात आली. त्यावेळी आरोपी धनवटे चोरीच्या बाईकवरून तिथे आला. बाईक बाबत चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिकची माहिती विचारली असता त्याने ती बाईक चोरी केल्याचे सांगितले. त्या गाडी चोरीचा गुन्हा म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, आरोपीला न्यायालयासमोर उपस्थित केले असता त्याला तीन दिवस पोलीस रिमांड घेऊन तपास करण्यात आला. त्यामध्ये आरोपीने आणखी तीन मोटर सायकल चोरीची कबुली दिली, असे त्याच्याकडून एकूण चार मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.