नवी दिल्ली : आयुष्यभर आपल्या सुरेल आवाजाने संगीत जगताला नव्या उंचीवर घेऊन जाणार्या गान कोकिळा लता मंगेशकर आता आपल्यामध्ये नाहीत. त्यांचे आज 6 फेब्रुवारीला 92 व्या वर्षी निधन झाले आहे. सुर साम्राज्ञी लता मंगेशकर यांचे गाणे कुणाच्याही हृदयाची तार छेडण्यासाठी पुरेसे होते. परंतु त्या आपले आयुष्य एकटीने जगल्या. बालपणापासून 92 वर्षापर्यंत त्यांनी हजारो गाणी गायली, संपूर्ण जगात त्यांचे चाहते बनले परंतु प्रेमाच्या बाबतीत त्यांचे जीवन का अलिप्त राहिले, असा प्रश्न सर्वांनाच पडतो.
लता मंगेशकर संपूर्ण आयुष्यभर अविवाहित राहिल्या परंतु त्याच्या जीवनात कधी प्रेमाची चाहुल लागली होती का, त्यांचे कुणावर प्रेम जडले होते का, हे असे प्रश्न आहेत, ज्याचे उत्तर सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. तर सत्य हे आहे की, सुरांची महाराणी लता मंगेशकर यांनाही प्रेम झाले होते, ती गोष्ट वेगळी आहे की हे प्रेम विवाहाच्या टप्प्यापर्यंत पोहचू शकले नव्हते.
डूंगरपुरचे महाराजा, दिवंगत क्रिकेटर आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राज सिंह यांचे लता मंगेशकर यांच्यावर प्रेम जडले होते. इतके की एकदा लता मंगेशकर क्रिकेट पाहण्यासाठी स्टेडियमध्ये सुद्धा गेल्या होत्या.
त्यांनाही महाराजा राज सिंह पसंत आले परंतु हे प्रेम विवाहापर्यंत पोहचू शकले नाही. असे म्हटले जाते की, काही कौटुंबिक कारणांमुळे राज सिंह डूंगरपुर आणि लता मंगेशकर यांचा विवाह होऊ शकला नव्हता.
मीडिया रिपोर्टनुसार किशोर दा लता मंगेशकर यांच्यावर प्रेम करत होते. इतके की त्यांचा पाठलाग करत ते स्टुडिओपर्यंत जात होते. परंतु हे लता मंगेशकर यांना पसंत नव्हते. यावर त्यांनी अक्षेपही घेतला होता.
परंतु त्यांना त्यावेळी माहित नव्हते की ते किशोर कुमार आहेत. मात्र, लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, किशोर कुमार यांच्यासोबत रेकॉर्डिंग करण्यास लतादीदींनी नकार दिला होता कारण ते खुप हसवत असत आणि यामुळे त्यांचा आवाज गाण्यात थकलेला वाटत असे.