देशी विदेशी दारूसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पिंपरी : बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारू तसेच बियरच्या बाटल्यांची साठवणूक करून आजूबाजूच्या परिसरात त्याची विक्री करणाऱ्यांवर सामाजिक सुरक्षा विभागाने काल (दि.७ फेब्रुवारी) कारवाई केली आहे. या कारवाईत एक महिंद्रा बोलेरो व दारू-बिअरच्या बाटल्या असा ८ लाख ११ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चंद्रकांत भीमा ओव्हाळ (३०, रा. गडद, खेड, पुणे), गणेश नंदू पडवळ (३८, रा. आंबेठाण, खेड, पुणे) व शेफ वे वाईन्सचा मालक अशा तिघांवर चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ओव्हाळ हा गाडीचा ड्रायव्हर व आरोपी पडवळ हा दारूचा मालक आहे. हे दोघेही शेफ वे वाईन्स या दुकानातून विनापरवाना मोठ्या प्रमाणात दारू व बिअरच्या बाटल्या घेऊन त्यांची बेकायदेशीरपणे घरात साठवणूक करीत होते. त्यांनतर आजूबाजूच्या परिसरात वाहतूक करून त्यांची विक्री करीत होते. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस अंमलदार विजय कांबळे यांना माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन-तीन दिवसांपासून सापळा रचून ७ फेब्रुवारीला दुपारी २.३० वा.च्या सुमारास छापा टाकून मुद्देमालासाहित आरोपींना पकडले. त्यांच्या ताब्यातून ४,०१,१७५/- रु. किमतीच्या देशी विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या तसेच ४,१०,०००/- रु. किमतीची बोलेरो पिकअप गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करीत आहे.

वरील कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहा. पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस उप निरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोळी उप निरीक्षक धैर्यशील सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, सुनील शिरसाट, नितीन लोंढे, भगवंता मुठे, अमोल साडेकर, मारुती करचुंडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, अतुल लोखंडे, योगेश तिडके, अमोल शिंदे, सुमित डमाळ यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.