भोसरी- शिवजन्मभूमी जुन्नर पीएमपी बस सुविधा लोकार्पण उत्साहात

कामागार नेते सचिन लांडगे, भाजपा नेत्या आशा बुचके यांची उपस्थिती

0

पिंपरी : भोसरीतील बसटर्मिनल ते शिवजन्मभूमी छत्रपती शिवाजी महारात पुतळा, जुन्नर या मार्गावील  पीएमपी बस सुविधेचे लोकार्पण उत्साहात करण्यात आले. त्यामुळे हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेल्या किल्ले शिवनेरीला जाण्यासाठी शिवभक्त आणि पर्यटकांना आणखी एक सुविधा निर्माण झाली आहे.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी किल्ले शिवनेरीला जाणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी. याकरिता पीएमपीएमएल प्रशासनाकडे भोसरी ते जुन्नर अशी बस सुविधा सुरू करण्याबबात पाठपुरावा केला होता. प्रशासनाने आता ही सुविधा सुरू केली आहे.

भोसरीतील बस टर्मिनल ते जुन्नर या बस सुविधेचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले. यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, भाजपाच्या नेत्या आशा बुचके, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभाती नितीन लांडगे यांच्यासह पीएमपीचे अधिकारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कामगार नेते सचिन लांडगे म्हणाले की, पुणे जिल्हात स्वराज्याचे प्रतिक असलेले किल्ले शिवनेरी जुन्नरमध्ये आहे. आपल्या शहरातून अनेक पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात असतात. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नागरिक हे मंचर, जुन्नर व आंबेगाव या ठिकाणी नोकरी निमित्त ये-जा करतात, अनेक महिला व विद्यार्थीची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. या मार्गावर खासगी वाहनातून प्रवास करणे महिलांना व विद्यार्थ्यांना जोखमीचे असून प्रवास करतेवेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था झाली असून, नागरिकांना आणि शिवप्रेमींनाही दिलासा मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.