एवढी मस्ती,गुर्मी आली आहे की…

0

पुणे : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळासंदर्भात पुणे महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी आलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटने नंतर किरीट सोमय्या आज (शुक्रवार) पुन्हा पुण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांना ज्या पायरीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाडून जखमी केले होते. त्याच पायरीवर आता भाजप त्यांचा सत्कार करत शिवसेनेला उत्तर देणार आहे. त्यापूर्वी त्यांनी पुणे विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर गांभीर आरोप केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाशी खळण्याचा ठेका उद्धव ठाकरे यांनी दिला आहे का? उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या मदतीने कोविडमध्ये लोकांच्या जीवाशी खेळण्याचे पाप केले आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी आज पुन्हा एकदा पोलीस, महापालिका यांना आग्रह करणार आहे की, घोटाळा करणारी कंपनी हेल्थकेअर लाइफलाइन यांच्यावर कारवाई करा, असे सोमय्या यांनी सांगितले.

मागील वेळी मुख्यमंत्री कार्यालयाने 100 गुंड पाठवले आणि तक्रार होऊ दिली नाही, कारवाई कशी होत नाही, पाहतोच, असा इशारा सोमय्या यांनी यावेळी दिला. सत्कारासंदर्भात बोलताना सोमय्या म्हणाले, सत्काराला महत्व नाही. त्या कंपनीवर कारवाई करावी लागणारच आहे. संजय राऊतांना जाब द्यावा लागेल असे म्हणाले.

संजय राऊत धमकी कोणाला देतात? संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आहे की लोकांचा जीव घेणार, बोगस कंपन्यांकडून कंत्राट घेणार. महाराष्ट्रातील जनतेची हत्या होऊ देणार आणि त्यानंतर काही होणार नाही असे जर त्यांना वाटत असेल तर ते मुर्ख आहेत. अनिल देशमुख जेलमध्ये गेलेत. राऊतांचे मित्र, परिवार, पर्टनर यांच्यावर देखील कारवाई होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.