पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हिंजवडी येथे स्नेह सोशल फाउंडेशन आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरु करण्यात आले आहे.
शुक्रवार 12 फेब्रुवारी 2022 ते 19 फेब्रुवारी 2022 या कालावधीत गॅलक्सी हॉस्पिटल लक्ष्मी चौक यांच्या सौजन्याने होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन स्नेह सोशल फाउंडेशनचे सभासद दिलीप भरणे , विलास साखरे, साहेबराव जाधव, बाबासाहेब बुचडे, दत्तात्रय कुंजीर, युवराज पायगुडे, विठ्ठल पारखी, अरुण ढमाले, गोकुळ जांभूळकर, वसंत जांभूळकर संतोष साखरे, तानाजी जाधव, ईश्वर बुचडे, मनोज विनोदे, विश्वनाथ जांभूळकर, महादेव उमाप, सुनील कड, दत्तात्रय साखरे, शैलेंद्र जाधव, राजेंद्र पायगुडे, राजेंद्र राठोड, विनोद वाकडकर, राजेंद्र जांभूळकर, मारुती खुळे, सदाशिव बुचडे, संतोष बहिरट यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे विशेष सहकार्य गॅलक्सी हॉस्पिटल चे डॉ. स्वरूप पाटील व अमित काटे यांनी केले आहे.