एमक्युअर फार्मास्युटिकल कंपनीला 1 कोटी 95 लाखांचा गंडा

0

पिंपरी : भोसरी येथील एमक्युअर फार्मास्युटिकल कंपनीला 1 कोटी 95 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. चिनी कंपनीचा बनावट ई-मेल आयडी तयार करुन, बॅंकेच्या बदलेल्या खात्याची माहिती पाठवली व खात्यात पैसे जमा करून घेतले. हा प्रकार 26 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर 2021 दरम्यान घडला.

कंपनीचे कायदेविषयक सल्लागार कमलेश कुमार त्रिवेदी (वय 36, रा. रावेत) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील एमक्युअर फार्मास्युटिकल कंपनीचे चीन मधील ट्रुकिंग टेक्नॉलॉजी कंपनी सोबत व्यावसायिक संबंध आहेत. औषध उत्पादनासाठी आवश्यक साधन सामुग्री या कंपनीकडून घेत असतात.

साधन सामुग्री साठी एक व्यवहारात 30 टक्के रक्कम कंपनीला पाठविण्याचे ठरले. अज्ञात इसमाने ट्रुकिंग टेक्नॉलॉजी कंपनीचा बनावट ई मेल आयडी निर्माण केला व बॅंक खाते बदलले असल्याचे सांगून 1 कोटी 95 लाख 65 हजार 793 रुपये आपल्या खात्यात जमा करून घेतले. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.